• Fri. Jun 5th, 2026
    Baramati Plane Crashed : अजित पवारांचा जिथे अपघात, तिथून 1 किमीवर शिकाऊ विमान कोसळलं; बारामतीत पुन्हा भीषण दुर्घटना

    Pune Baramati Training Plane Crashed in Gojubabi Village : पुण्यातील बारामतीमधील गोजुबाबी गावाच्या हद्दीत एक शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

    बारामती शिकाऊ विमान अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, पुणे (बारामती) : चार महिन्यांपूर्वी म्हणजेच 28 जानेवारी रोजी राष्ट्रवादीचे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने हादरलेल्या बारामतीत पुन्हा एकदा शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. रेडबर्ड एव्हिएशन कंपनीचं प्रशिक्षणार्थी विमान गोजुबाबी गावाच्या हद्दीत कोसळल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातात शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    नेमका कसा झाला अपघात?

    मिळालेल्या माहितीनुसार, रेडबर्ड एव्हिएशन अकॅडमीचे हे प्रशिक्षण विमान नियमित सरावासाठी उड्डाण करत होतं. दरम्यान, अचानक तांत्रिक बिघाड अथवा अन्य कारणामुळे विमानाचा ताबा सुटल्यानं ते गोजुबाबी गावाजवळ कोसळलं. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून परिसर बंदोबस्ताखाली घेण्यात आला आहे.
    Maharashtra TimesPramod Hindurao : अजितदादांच्या निधनानंतर मोठे दावे, आता सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेची आस, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या नावाची चर्चा

    याच परिसरात अजित पवारांच्या विमानाचा अपघात

    या अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तांत्रिक बिघाड, हवामान किंवा मानवी चूक यापैकी कोणत्या कारणामुळे विमान कोसळलं? याचा तपास सध्या सुरू करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक विभागाकडूनही चौकशी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, याच गोजुबाबी गावाच्या परिसरात चार महिन्यांपूर्वी माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता. तिथून 1 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला असून, त्यामुळे पुन्हा त्याच भागात घडलेल्या या घटनेमुळे बारामतीकरांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

    पार्थ पवारांची भागिदारी असलेल्या ‘अमेडिया’ कंपनीला दणका

    उपमुख्यमंत्रिपदावर असताना विमान अपघातात निधन झालेले दिग्गज नेते अजित पवार यांचे पुत्र आणि खासदार पार्थ पवार हे भागीदार असलेल्या ‘अमेडिया’ कंपनीला नोंदणी महानिरीक्षकांनी दणका दिला आहे. सरकारी जमीन खरेदी करताना आयटी पार्क स्थापन करण्याच्या नावाखाली घेतलेली मुद्रांक शुल्कमाफी मिळण्याचा या कंपनीचा अर्ज आता नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी फेटाळून लावला आहे.
    Maharashtra TimesMonsoon Prediction: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून आगमनाचा यंदापासून स्थानिक अंदाज, महिनाभर आधीच कळणार तारीख!
    मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी ‘अमेडिया’ कंपनीला बजावलेला २२ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्रांक शुल्क भरण्याचा आदेश बिनवडे यांनी कायम केला. त्यामुळे मुद्रांक शुल्कातून माफी मिळवण्याची पार्थ यांच्या कंपनीची योजना फसली आहे. ‘अमेडिया’ कंपनीला या आदेशाविरोधात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा