Mumbai Local Accident:मुंबई उपनगरीय रेल्वेवरील सर्व लोकल गाड्यांमध्ये, मोटरमन्सना अधिक सुरक्षित कामकाज करण्यास मदत करण्याच्या उद्देशाने, मध्य रेल्वेने ‘सिग्नल लोकेशन अनाउन्समेंट सिस्टीम’ सुरू केलं आहे.
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: रेल्वेमार्गावर मानवी चुकांमुळे सिग्नल ओलांडल्याने अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेने अद्ययावत पाऊल उचलले आहे. यानुसार उपनगरी रेल्वेवरील सिग्नलची माहिती आता मोटरमनना ऐकू येणार आहे. यासाठी लोकलमधील मोटरमनच्या कक्षात ‘सिग्नल लोकेशन अनाउन्समेंट सिस्टीम’ (सिलास) कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे सिग्नलची दिशा, धोक्याचा इशारा वेळेआधीच ऐकू येणार आहे.
मुंबई उपनगरी मार्गावर बहुतांश सिग्नल हे अवघ्या ४०० ते ५०० मीटर अंतरावर असल्याने मोटरमनना सतर्क राहावे लागते. सुमारे ४००पैकी काही सिग्नल उजव्या, तर काही डाव्या बाजूस असल्याने अडचणींमध्ये भर पडते. या अडचणी दूर करत सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी ‘सिलास’ ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. ही यंत्रणा जीपीएसवर आधारीत असून ती रेल्वेच्या थेट स्थानानुसार पुढील सिग्नलचा क्रमांक आणि दिशा जाहीर करते. ‘पिवळा’ सिग्नल पार केल्यानंतर ‘काळजी घ्या, पुढचा सिग्नल लाल आहे’ असा सतत इशारा दिला जातो. सर्व मार्गांवरील सिग्नलचे ‘ऑडिओ रेकॉर्डिंग’, ‘जीपीएस कोऑर्डिनेट्स’ आणि स्थानकांची माहिती प्रणालीमध्ये आधीपासून जमा केलेली आहे. याद्वारे लोकलचे ‘रिअल-टाइम लोकेशन’ आणि वेग नियंत्रण कक्षातून पडताळता येणार आहे.
Mumbai Local: मुसळधार पावसातही लोकल धावती राहणार! रेल्वे स्थानकांवर कामं सुरू; पश्चिम रेल्वेवर प्रवास सुखकर होणार
सिग्नलजवळ पोहोचण्यापूर्वी ३५० मीटर आणि २५० मीटर अंतरांवर ‘ऑडिओ अॅलर्ट’.
पुढील स्थानकाची घोषणा ५०० मीटर आणि २५० मीटर आधी केली जाते.
प्रणालीद्वारे पिवळा सिग्नल, पीएसआर, फलाट प्रवेश वेग तपासून त्याचे विश्लेषण केले जाते.
मोटरमनच्या ड्रायव्हिंग पद्धतीचे विश्लेषण करून सुरक्षितता सुधारण्यासाठी मार्गदर्शन.
भारत टॅक्सीसाठी चालकांचा पुढाकार
केंद्राच्या सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेडअंतर्गत (एसटीसीएल) सुरू होणाऱ्या भारत टॅक्सीसाठी महामुंबईसह पुण्यातील चालकांनी पुढाकार घेतला आहे. ‘सारथी हाच मालक’ संकल्पनेवर आधारित काम करणाऱ्या टॅक्सीसेवेत सहभागी होण्यासाठी बैठक नुकतीच झाली. कंपन्यांकडून आकारले जाणारे कमिशन, चालकांचे उत्पन्न आणि वाहतूक धोरण याविषयी १८ संघटनांमध्ये चर्चा झाली. मार्च २०२६पर्यंत सुमारे ३.७६ लाख चालकांची नोंदणी झाल्याचा दावा एसटीसीएलकडून करण्यात आला.
Virar-Dahanu Quadrupling: चौपदरीकरणाची संथगती; विरार-डहाणू रेल्वेमार्गाचे काम जून, 2027पर्यंत पूर्ण होण्याबाबत साशंकता
अ ॅप-आधारित टॅक्सी आणि रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर संयुक्तपणे लढा उभारणे आणि सामाजिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर एकत्रित भूमिका घेण्यासाठी परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात बैठक नुकतीच पार पडली. भारत टॅक्सी आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ अ ॅप-आधारित परिवहन युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा