Nashik to Haryana NEET Paper Leak : NEET पेपर लीक प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली असून प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर पहिली कॉपी नाशिकमध्ये समोर आली होती, तर आता एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
नाशिक नीट पेपरफुटी इंदिरानगर आरोपी ताब्यात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : देशातील 22 लाख 39 हजार विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचं भविष्य ठरवणारी यंदाची नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. NTA म्हणजे नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून 3 मे रोजी घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असंही सांगण्यात आलंय. धक्कादायक बाब म्हणजे आता, या पेपरफुटीचे धागेदोरे नाशिकमधून समोर आले आहेत. नीट परीक्षेचा पहिला पेपर नाशिकमध्ये फुटला, येथून पहिली प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे.
पेपरचे 10 संच तयार
NEET पेपर लीक प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली असून प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर पहिली कॉपी नाशिकमध्ये समोर आली. यानंतर नाशिकमधील ही लीक प्रश्नपत्रिका हरियाणात पोहोचली, येथे फुटलेल्या पेपरचे 10 संच तयार करण्यात आले. त्यानंतर, हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीरपर्यंत ही प्रश्नपत्रिका सहजपणे पोहोचल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रश्नपत्रिकेत 100 प्रश्न एकसारखीच असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे, नीट परीक्षेसाठी काम करणाऱ्या संस्था आणि एजन्सीच्या कामकाजावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, नीट पेपरफुटीच्या प्रकरणाचा तपास आता देशातील सर्वात सक्षम तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयकडे देण्यात आला आहे. याचदरम्यान, या प्रकरणात नाशिकच्या इंदिरानगर भागातून एकाला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे. अद्याप काहीही ठोस माहिती समोर आलेली नाही. हरियाणा आणि राजस्थान पोलिसांच्या तपासात नाशिक, केरळ, राजस्थान, झुंझुणु येथून पेपर फुटल्याचं समोर आलं आहे. NEET UG 2026 Cancellation Timeline: नीट परीक्षेचा ‘३ मे ते १२ मे’चा थरार! पेपरफुटीचा संशय ते थेट रद्द करण्याचा निर्णय; नक्की काय घडलं १० दिवसांत?
राहूल गांधी काय म्हणाले?
नीटच्या पेपरफुटीनंतर काँग्रेस खासदार राहूल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ‘नीट 2026 परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या भ्रष्ट भाजप सरकारने 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्ने चिरडून टाकली आहेत. काही वडिलांनी कर्ज घेतले, काही मातांनी आपले दागिने विकले, लाखो मुलांनी रात्रभर जागून अभ्यास केला, आणि त्याबदल्यात त्यांना पेपरफुटी, सरकारी निष्काळजीपणा आणि शिक्षणातील संघटित भ्रष्टाचार त्यांच्या वाटेला आला. हे केवळ एक अपयश नाही, तर तरुणांच्या भविष्याबाबत केलेला एक गुन्हा आहे.
NEET UG 2026 Exam: विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा धक्का! ३ मे ची ‘नीट’ परीक्षा रद्द; आता पुन्हा द्यावी लागणार परीक्षा, NTA चा निर्णय
‘अमृतकाळ’ देशासाठी विषारी युग
प्रत्येकवेळी पेपर माफिया निर्दोष सुटतो, तर प्रामाणिक विद्यार्थ्यांना शिक्षा भोगावी लागते. आता, लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा तोच मानसिक ताण, आर्थिक भार आणि अनिश्चितता सहन करावी लागेल. जर एखाद्याचे भविष्य मेहनतीने नव्हे, तर पैसा आणि वशिल्याने ठरत असेल, तर शिक्षणाला काय अर्थ उरेल? पंतप्रधानांचे तथाकथित ‘अमृतकाळ’ देशासाठी विषारी युग बनलं आहे’.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा