Nashik NEET Paper Leak Shubham Father Reaction : नुकतेच उजेडात आलेलं नीट पेपरफुटी प्रकरणात 30 वर्षीय संशयित आरोपी शुभम खैरनारला ताब्यात घेण्यासाठी CBIचं पथक नाशकात दाखल झालं आहे. या संपूर्ण प्रकरणावर शुभमचे वडील डॉ.मधुकर खैरनार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नीट पेपरफुटी प्रकरण शुभम खैरनार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रईस शेख, नाशिक (नांदगाव) : यंदाची NEET परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली आहे. 3 मे रोजी NEETची परीक्षा पार पडली होती. पण पेपरफुटीमुळे NTA म्हणजे नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असंही सांगण्यात आलंय. धक्कादायक बाब म्हणजे आता, या पेपरफुटीचं कनेक्शन नाशिकमधून समोर आलं आहे. नीट परीक्षेचा पहिला पेपर हा नाशिकमध्ये फुटला असून, येथून पहिली प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात 30 वर्षीय शुभम खैरनार या संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. हा आरोपी जिल्ह्यातील नांदगावातील आहे. या सर्व प्रकरणावर शुभमच्या डॉक्टर वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शुभम खैरनारचे वडील काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्य घडविण्यासाठी महत्वाची असलेली NEET परीक्षा रद्द करण्यात आली. यामध्ये NEETचा पेपर लीक झाल्यानं ही परीक्षा रद्द झाली असून यामध्ये नांदगाव येथील शुभम खैरनार याला याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं जबाबदार धरत ताब्यात घेतलं आहे. आता CBI चे पथक नाशिकमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. नाशिक गुन्हे शाखा 2च्या कार्यालयात CBIचं पथक शुभम खैरनारला ताब्यात घेण्यासाठी दाखल झालं आहे. दरम्यान, आता शुभमचे वडील डॉ. मधुकर खैरनार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली असून याप्रकरणी ‘आमचा मुलगा निर्दोष आहे. गेल्या सहा महिन्यापासून तो नाशिकमध्ये BAMSची प्रॅक्टीस करत आहे. त्याचा या प्रकरणाशी संबंध नसणार आहे. जरी त्याचं या प्रकरणात नाव येत असेल तर त्याची चौकशी व्हावी’, असं शुभम खैरनार याचे वडील डॉ.मधुकर खैरनार यांनी म्हटलं आहे. Nashik Paper Leak : कपडे बदलले, टक्कल केलं, तरीही पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं? NEET पेपरफुटी प्रकरणात नांदगावचा तरुण ताब्यात
‘सूत्रधार शोधून कारवाई करा’
‘नीट परीक्षेसाठी सामान्य विद्यार्थी वर्षानुवर्षे अभ्यास करतात. मात्र, 2024ला नीटचा पेपर फुटल्याचा आपण सर्वांनी पाहिला. काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात SRPFचा पेपर फुटल्याचा देखील आपण पाहिलं, आणि आता यावर्षीसुद्धा पेपरमध्ये जसेच्या तसे प्रश्न येतात. मग याच्यामागे मलिदा कोण खात आहे? यामागे पैसा कोण घेत आहे? हा जो भ्रष्टाचार आहे तो सामान्य मुला-मुलींच्या भवितव्यासाठी धोकादायक आहे. आज परीक्षा रद्द झाली. मात्र, या मागचा सूत्रधार शोधण्याची गरज आहे आणि कडक कारवाई व्हावी. अन्यथा हेच विद्यार्थी सरकारला लोकशाही पद्धतीने उत्तर देतील’, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा