• Thu. Jun 18th, 2026
    Sangli News : मोटेवाडी यात्रेत दुर्घटना, पावसापासून वाचायला आडोशाला उभे राहिले, 200 फुटांची भिंत अंगावर कोसळली; 6 भाविक दगावले

    Motewadi yatra tragedy: सांगलीच्या जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई यात्रेदरम्यान वादळाने भीषण दुर्घटना घडली आहे. पावसापासून बचावासाठी भिंतीचा आडोसा घेणाऱ्या भाविकांच्या अंगावर भिंत कोसळली. या दुर्घटनेमध्ये ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. १७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मंगळवारी भरलेल्या मरगुबाई देवीच्या यात्रेदरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भीषण दुर्घटना घडली. अचानक आलेल्या वादळामुळे यात्रेसाठी आलेले भाविक बचावासाठी एका मोठ्या भिंतीच्या आडोशाला उभे राहिले होते. त्याचवेळी जोरदार वाऱ्यामुळे पुढील बाजूस उभारलेले पत्र्याचे शेड उडून भिंतीवर आदळले आणि सुमारे दोनशे फुटांची भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत अंदाजे सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १५ ते १७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

    भिंतीलगत उभे राहिले अन्…

    घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मोटेवाडी येथील मरगुबाई देवीची यात्रा मंगळवार व शुक्रवार या दिवशी मोठ्या प्रमाणात भरते. यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही हजारो भाविक उपस्थित राहत असतात. मंगळवारी सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी अनेक यात्रेकरू भिंतीलगत उभे राहिले होते. मात्र काही क्षणांतच वाऱ्याचा वेग वाढल्याने पुढील बाजूस उभारलेले पत्र्याचे शेड उडाले व त्याचा धक्का बसून भिंत कोसळली.

    मयत झालेली नावे

    पाडोंझरी येथील मंगल भाऊसाहेब मोठे (वय ४५ पाडोंझरी), अरुण विजय गेजगे (वय 14 डोमनाळ) सोनू लक्ष्मण गेजगे (वय १४, रा. डोमनाळ) ता. जि. विजयपूर, कर्नाटक), कोंडीबा साऊबा गेजगे (वय 65 रा. दरीबडची),संजुबाई राम चौधरी (वय 51कर्नाटक टक्कळकी ), शंकर आबा लोखंडे (वय 75, रा. दरीबडची) यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    Maharashtra TimesPm Awas Yojana Satara Event 2026: साताऱ्यात शासकीय सोहळ्यासाठी लाखोंची उधळपट्टी; पीएम मोदींच्या आवाहनाला हरताळ!

    जखमींची नावे

    दर्याप्पा नागा कोकरे, मुर्शिद पुजारी, मरीबा नागा कोकरे,संजू आप्पासो एवळे,शिवा गेजगे, कोंडीबा बिरा गेजगे, बिरू विजू गेजगे,यांच्यासह १५ ते १७ जण जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

    प्रशासनाची घटनास्थळी उपस्थिती

    घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे, जत पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन थोरबोले, नायब तहसीलदार पंडित कोळे, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य तातडीने हाती घेण्यात आले असून जखमींना त्वरित उपचारासाठी हलविण्यात आले.

    या घटनेमुळे मोटेवाडी परिसरात शोककळा पसरली असून यात्रेचे वातावरण क्षणात दुःखद बनले. अचानक घडलेल्या या दुर्घटनेने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा