Orange Gate-Marine Drive Tunnel: ‘एमएमआरडीए’ने मुंबईमध्ये ऑरेंज गेट आणि मरिन ड्राइव्ह दरम्यान भुयारी मार्गाचं काम सुरू आहे. या खोदकामाचा महत्त्वाचा टप्पा गाठला असून 250 मीटर काम पूर्ण झालं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: शहरातील पहिलाच भुयारी बोगद्याच्या खोदकामाला अखेर सुरूवात झाली आहे. डिसेंबर 2025मध्ये लाँचिंग शाफ्टमध्ये मावळा या टीबीएम मशीने खोदकामास सुरूवात केली होती. त्यानंतर, गेल्या 5 महिन्यांमध्ये मावळ्यासह 250 मीटर भुयारीकरण यशस्वी झालं आहे. त्यामुळे मुंबईतील सर्वात लांब भूमिगत शहरी बोगद्याला वेग मिळला आहे.
गिरगाव चौपाटीपर्यंत विस्तार
मुंबईसारखी दाट लोकवस्ती असलेल्या परिसराखालून बोगदा बनवणे हे सर्वात कठीण काम मानलं जातं आहे. देशातील सर्वाधिक व्यासाचा हा बोगदा असेल. पूर्व द्रुतगती महामार्गावरून ते मरिन ड्राइव्हपर्यंत यापूर्वी हा मार्ग प्रस्तावित होता. आता याचा विस्तार मुंबईत पुढे गिरगाव चौपाटीपर्यंत केला जाणार आहे. या संपूर्ण मार्गावर सिग्नल आणि कोंडीमुक्त प्रवास शक्य होणार आहे. या भुयारी मार्गाच्या कामासाठी देशातील सर्वात मोठी स्लरी शील्ड टनेल बोरिंग मशीन वापरली जात आहे. मावळा नाव्याच्या या टीबीएमद्वारे 250 मीटर बोगदा खोदण्यात यश मिळाले आहे.Mumbai-Pune Expressway’s Missing Link: 10 दिवसांत एक्स्प्रेस वेचं चित्र बदललं; 70 टक्के वाहनांची वाहतूक ‘कनेक्टिंग लिंक’वर वळवली, अपघात, कोंडीतून सुटका
MMRDA मुंबईत हा मार्ग बनवत आहे. यामुळे 40 मिनिटांचा प्रवास अवघ्या 5 मिनिटांत शक्य होणार आहे. सायंकाळी वाहतूक कोंडीच्या वेळीही प्रवाशांना या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. यासह इंधनाची बचतही होईल. या संपूर्ण मार्गावर 4.8 किमी लांबीच्या दुहेरी बोगद्यांचा समावेश आहे. प्रत्येक बोगदा दोन पदरी असून एक अपात्कालिन लेन असेल. या मार्गावरून ताशी 80 किमी वेगाने प्रवास करू शकतात. तसेच, सुरक्षेसाठी प्रत्येक 300 मीटर अंतरावर क्रॉस पेसेज बांधले जातील.
कसा असेल मार्ग?
जमिनीखाली 50 मीटर खोल हे बोगदे बांधले गेले आहेत. शहरातील इमारती, रेल्वे मार्ग आणि मेट्रो मार्गांखालून हा मार्ग जाणार आहे. या टीबीएम मशीनला 12.19 मीटर व्यासाचे कटरहेड असून, लांबी 80 मीटर आणि वजन तर चक्क 2,400 टन आहे.
Weather Alert: राज्यात उन्हामुळे काहिली! वादळी पावसाचा इशारा तरीही तापमान चढेच राहणार; मराठवाडा, विदर्भ, कोकणात ‘अलर्ट’
मानखुर्द आणि चेंबुर जंक्शनला जोडणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्गामुळे दक्षिण मुंबईतील कनेकटीव्हीटी सुधारली आहे. परंतु, या मार्गावरील ऑरेंज गेट भागाजवळ वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. त्यामुळे या बोगद्याची निर्मिती करण्यात येत आहे. या मार्गावरील बोगदे पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गांसह मुंबई मेट्रो 3 खालून जाणार आहे. मार्ग पूर्ण होताच दक्षिण मुंबईतील पूर्व आणि पश्चिम भागांशी कनेकटीव्हीटी वाढणार आहे. तसेच, अटल सेतू आणि कोस्टल रोडपर्यंत पोहोचणं ही सोपं होणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा