• Sun. Jun 7th, 2026
    Shrikant Shinde Daura: श्रीकांत शिंदेंचा राज्यव्यापी दौरा; 22 जिल्हे अन् 100हून अधिक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणार, कसा असेल दौरा?

    Shrikant Shinde Daura: १६ मे ते १५ जुलैपर्यंत दोन महिने चालणाऱ्या या व्यापक दौऱ्यात ते राज्यातील २२ जिल्हे आणि शंभरहून अधिक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणार आहेत.

    श्रीकांत शिंदे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना संघटना अधिक सक्षम आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेनेचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विधानसभानिहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी संवाद दौरा १६ मेपासून सुरू होत आहे.

    शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. श्रीकांत शिंदे यांच्याकडे मुंबई आणि ठाणे लोकसभा क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यानंतर त्यांनी मुंबई आणि ठाणे परिसरात संवाद दौरे पूर्ण केले असून त्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही दौरे केले होते.

    Maharashtra TimesRohit Pawar: आरोपांचा अहवाल जाहीर करा! MMRDAबाबत आमदार रोहित पवार यांची मागणी
    २०२४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही त्यांनी राज्यातील ६५ ते ७० विधानसभा मतदारसंघांचा दौरा करत तळागाळातील कार्यकत्यांशी थेट संवाद साधला होता. मोठ्या सभांपेक्षा प्रत्यक्ष भेटींवर भर देत कार्यकत्यांकडून सूचना, मते आणि स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत निवडणूक रणनीती आखली होती. पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी अशा संवाद दौऱ्यांना महत्त्वपूर्ण मानले जाते. याच पद्धतीने आता पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे हे राज्यव्यापी दौरा करणार आहेत.

    या दौऱ्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, बूथस्तरावरील पक्षबांधणी, संघटनात्मक रणनीती, विविध आघाड्या आणि विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. विशेषतः ‘एसआयआर’ मोहिमेअंतर्गत बीएलए आणि बूथ प्रमुखांच्या नियुक्त्यांबाबतही चर्चा होणार आहे.

    Maharashtra TimesPM Modi यांचं खाद्यतेल, पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचं, सोने वर्षभर खरेदी न करण्याचं आवाहन, मुख्यमंत्र्याची पहिली प्रतिक्रिया काय?
    …असा असेल दौरा
    खासदार शिंदे यांच्या दौऱ्याची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून होत असून, पहिल्या टप्प्यात मे महिन्यात नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांमध्ये बैठकी होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात जून महिन्यात जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये संवाद दौरा पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यात जुलै महिन्यात बुलढाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश राहणार आहे .

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा