Nashik TCS Case : निदाने पीडितेच्या घरी जात धार्मिक शिक्षण देणे, निदाच्या धर्माची प्रार्थना करणे, तिच्या धर्माचा पोशाख पीडितेला परिधान करायला लावण्यासह तिचे मत परिवर्तन केल्याचे समोर आले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : बहुराष्ट्रीय कंपनीतील पीडितेवर अत्याचार आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या गुन्ह्यातील संशयित निदा एजाज खान हिची विशेष तपास पथकाने (एसआयटी) कसून चौकशी सुरू केल्यावर अनेक धक्कादायक मुद्दे समोर येत आहेत. निदाने तिच्या धर्माचे विधी पीडितेच्या घरात जाऊन केले असून, पीडितेलाही त्या स्वरूपात प्रार्थना व वर्तन करण्यास भाग पाडल्याचे तपासात समोर येत आहे. तिने पीडितेला धार्मिक मुद्द्यांवरील १७१ लिंक्स पाठवल्या असून, निदाच्या पोलिस कोठडीत आज, सोमवारी (दि. ११) वाढ होण्याची शक्यता आहे.
देवळाली कॅम्प पोलिसांत दाखल गुन्ह्यात २६ मार्चपासून पसार असलेल्या निदा खानचा २ मे रोजी नाशिकरोड न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता. गुरुवारी (दि. ७) छत्रपती संभाजीनगरातून तिला ताब्यात घेत पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून ‘ट्रान्झिट रिमांड’ घेत नाशिकमध्ये आणले. शुक्रवारी (दि. ८) निदा हिला नाशिकरोड न्यायालयात हजर केल्यावर ११ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानुसार तिला आज, सोमवारी (दि. ११) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येईल. Jitu Munda : 19 हजार 300 रुपयांसाठी बहिणीचा सांगाडा उकरुन बँकेत नेला, जितूच्या खात्यात आज 15 लाख रुपये, 12 दिवसात काय घडलं?
पीडितेचे मूळ नाव बदलण्याचा कट
तपासातील प्रगती विचारात घेता न्यायालय तिच्या कोठडीत वाढ करण्याची शक्यता आहे. यासह संबंधित गुन्ह्यातील संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार यांचाही ताबा ‘एसआयटी’ घेणार आहे. त्यानुसार तिघांची एकत्रित चौकशी होणार असून, त्यातून आणखी मुद्दे स्पष्ट होणार आहेत. त्यांनी पीडितेचे मूळ नाव बदलून ‘हानिया’ करण्यामागेही कट आणि धार्मिक मुद्द्यांनुसार ‘अर्थपूर्ण’ प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यासह निदाने पीडितेच्या घरी जात धार्मिक शिक्षण देणे, निदाच्या धर्माची प्रार्थना करणे, तिच्या धर्माचा पोशाख पीडितेला परिधान करायला लावण्यासह तिचे मत परिवर्तन केल्याचे समोर आले आहे.
– छत्रपती संभाजीनगरात निदा लपलेला फ्लॅट संशयित मतीन पटेल यानेच दिला होता – संभाजीनगर येथील फ्लॅट निदाच्या मावशीचा नाही; तिचा फ्लॅटसोबत कसलाही संबंध नाही – निदा गर्भवती असल्याने तिच्यासोबत तिची मावशी, आई व वडील संभाजीनगरात होते – निदा ही ‘एमआयएम’ च्या नगरसेवकापर्यंत कशी पोहोचली, अर्थसहाय्य कोणाचे याचा तपास सुरू – निदाने पीडितेला धार्मिक मुद्द्यांवरील तब्बल १७१ लिंक्स पाठवल्या होत्या Stuti Sonawane : 24 वर्षीय डॉ स्तुती सोनवणे मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, 60 वर्षीय डेंटल सर्जन तिच्यासाठी पितृतुल्य, कोर्टाकडून अटकपूर्व जामीन
नाशिकमध्ये नऊ गुन्ह्यांची नोंद
मुंबई नाका पोलिसांत कट रचून तरुणाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दानिश, तौसिफ, शाहरूख शेख, रझा मेमन यांच्यासह निदादेखील संशयित आहे. निदाविरोधात आतापर्यंत दोन गुन्हे नोंद असून कट रचून धर्मांतराचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी कलमांत वाढ केली आहे. कंपनीतील बलात्कार, विनयभंग व धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी नाशिकमध्ये नऊ गुन्हे नोंद आहेत.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा