Mumbai Local: ठाणे ते मुलुंडदरम्यान नव्या उपनगरिय रेल्वे स्थानकाला मान्यता मिळाली असून दोन्ही परिसरातील प्रवाशांसाठी एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईकर लोकल प्रवाशांना विशेषतः ठाणे-मुलुंडकरांना रेल्वेमंत्रालयाने खूषखबर दिली आहे. ठाणे-मुलुंडदरम्यान नव्या उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या निर्मितीस तत्त्वतः मान्यता देण्यात आली. त्यामुळे गेले अनेक वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाचे एक पाऊल पुढे पडले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मान्यतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली होती. त्यानुसार ठाणे-मुलुंडदरम्यान नव्या उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या निर्मितीस तत्त्वतः मान्यता देण्यात आली असल्याचे पत्र अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविले असून या प्रकल्पाला आता गती येणार आहे.
दोन्ही स्थानकांवरील गर्दी कमी होणार
‘नवे ठाणे’ रेल्वे स्थानकामुळे घोडबंदर, पोखरण मार्ग आणि वागळे इस्टेट परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकांवरील गर्दी अंदाजे 24 ते 31 टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर दररोज सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांसाठी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव 2019मध्ये मांडण्यात आला होता. या बांधकामाचं नेतृत्व मध्य रेल्वे करेल. तसेच, रेल्वे स्थानकावरील वित्त पुरवठा ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडद्वारे केला जाईल. मध्य रेल्वे रेल्वे ट्रॅक, प्लॅटफॉर्म आणि इतर पायाभूत सुविधा उभारणार आहे. या रेल्वे स्थानकाबाहेर स्वतंत्र डेक, वाहनांचे पार्किंग आणि एक बस टर्मिनल असणार आहे.
Thane News: रस्त्याच्या मधोमध स्थानकं, 3000 झाडांची कत्तल! ठाणे रिंग मेट्रोमुळे कोंडी कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती
काम कशामुळे रखडलं?
सुरवातीला या प्रकल्पासाठी 120 कोटी रुपये खर्च होईल अशी अपेक्षा होती. पण आता या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 245 कोटी रुपयांहून अधिक होईल अशी अपेक्षा आहे. ठाणे मेन्टल हॉस्पिटलसाठी राखून ठेवलेल्या 14.83 एकर भूखंडावर हे स्थानक बांधण्यात येणार आहे. मुंबई हायकोर्टाकडून मंजुरी मिळाल्यानंतर मध्य रेल्वेला 2023मध्ये ही जमीन मिळाली. परंतु, स्मार्ट सिटी बॉडीटच्या निधीअभावी हा प्रकल्प रखडला होता. मार्च 2026मध्ये या रेल्वे स्थानकाला शिवसेना नेते आनंद दिघे यांचं नाव देण्याचा निर्णय देखील मंजूर करण्यात आला.
ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान बांधलेल्या या नवीन स्थानकामुळे मुंबईसारख्या वर्दळीच्या भागांत रेल्वे कनेकटीव्हीटी सुधारणार आहे. ठाणे आणि मुलुंडमधील रहिवासी, कर्मचारी, व्यायसायिक आणि विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवाससुद्धा सोपा होणार आहे. यामुळे मध्ये रेल्वेच्या प्रवाशांना फायदा होईल.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा