• Sun. Jun 14th, 2026
    Central Railway : कसाऱ्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, रविवारी-सोमवारी दोन तासांचा ब्लॉक, प्रशासनाकडून वेळापत्रक जारी

    कसारा (इगतपुरी – खर्डी सेक्शन) येथे ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) संबधित अडथळा दूर करण्यासाठी पूर्वतयारीच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे : मध्य रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण या मार्गावर कसाऱ्यात इगतपुरी ते खर्डी सेक्शन इथे विशेष दोन तासांचा ब्लॉक पुढचे दोन दिवस घेतला जाणार आहे. हा ब्लॉक दुपारी साडेतीन ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कदाचित मनस्तापाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. या काळात रेल्वे प्रशासानकडून नेमकं काय नियोजन केलं जाणार आहे, याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

    मध्य रेल्वे, मुंबई विभागातील ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) कामासाठी अडथळा दूर करण्याच्या पूर्वतयारी करीता कसारा (इगतपुरी-खार्डी सेक्शन) येथे रविवार 10 मे आणि 11 मे (सोमवार) विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दोन्ही दिवशी दुपारी 3.50 ते 5.50 या काळात दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. इगतपुरी – खर्डी विभागातील अप आणि डाउन मेन लाईन्सवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत या मार्गावर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत, असं रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

    10 आणि 11 मे रोजी उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/ शॉर्ट ओरीजनेशन

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून अनुक्रमे १३.१०, १४.१७ आणि १४.४६ वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कसारा लोकल N19, N21 आणि N23 यांचा प्रवास आसनगाव येथेच थांबवला जाईल.

    कसारा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल गाड्या खालीलप्रमाणे आसनगाव येथून सुटतील:

    • कसारा येथून १५.३५ वाजता सुटणारी N24 गाडी आसनगाव येथून १६.१२ वाजता सुटेल.
    • कसारा येथून १६.१६ वाजता सुटणारी N26 गाडी आसनगाव येथून १६.५४ वाजता सुटेल.
    • कसारा येथून १७.०२ वाजता सुटणारी N24 गाडी आसनगाव येथून १७.३९ वाजता सुटेल.

    10 आणि 11 मे रोजी मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन

    गाडी क्रमांक 12143 लोकमान्य टिळक टर्मिनस – सुलतानपूर एक्स्प्रेस फक्त दिनांक १०.०५.२०२६ (रविवार) रोजी टिटवाळा येथे १६.४८ ते १७.०६ वाजेपर्यंत नियमित केली जाईल.
    गाडी क्रमांक 15066 पनवेल – गोरखपूर एक्स्प्रेस फक्त दिनांक ११.०५.२०२६ (सोमवार) रोजी टिटवाळा येथे १६.४८ ते १७.०६ वाजेपर्यंत नियमित केली जाईल.
    गाडी क्रमांक 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस – बलिया कामायनी एक्स्प्रेस दोन्ही दिवशी खर्डी येथे १५.२८ ते १८.०० वाजेपर्यंत नियमित केली जाईल.
    गाडी क्रमांक 13202 लोकमान्य टिळक टर्मिनस – राजगीर एक्स्प्रेस येथे नियंत्रित केली जाईल. दोन्ही दिवशी आटगाव येथे १६.२४ ते १८.०२ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस दोन्ही दिवशी खडवली येथे १६.२० ते १७.४० वाजेपर्यंत थांबवण्यात येईल
    गाडी क्रमांक 22221 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस ब्लॉकनंतरची पहिली ट्रेन असेल आणि ती खर्डी येथे १७.३० ते १७.५० या वेळेत नियमित केली जाईल.

    बंचिंगमुळे खालील गाड्यांना १० ते १५ मिनिटांचा विलंब होईल:

    गाडी क्रमांक 12173 लोकमान्य टिळक टर्मिनस – प्रतापगड उद्योगनगरी एक्सप्रेस (फक्त दिनांक १०.०५.२०२६ – रविवार रोजी)
    गाडी क्रमांक 12107 लोकमान्य टिळक टर्मिनस -सीतापूर एक्सप्रेस आणि
    गाडी क्रमांक 15268 लोकमान्य टिळक टर्मिनस – रक्सौल एक्सप्रेस फक्त दिनांक ११.०५.२०२६ (सोमवार) रोजी
    गाडी क्रमांक 11001 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बल्हारशाह नंदीग्राम एक्सप्रेस दोन्ही दिवशी

    उशिरा धावणाऱ्या किंवा वेळापत्रकात बदल केलेल्या मेल/एक्स्प्रेस गाड्या, जर असतील तर, त्यादेखील परिचालनाच्या सोयीनुसार नियमित केल्या जातील. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे, असं रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा