• Wed. Jun 10th, 2026
    Ashtavinayak Darshan: गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! अष्टविनायकातील तीन मंदिरे महिनाभर राहणार बंद, काय कारण?

    Ashtavinayak Darshan: गणेशभक्तांनो, उन्हाळी सुट्टीत अष्टविनायक यात्रेचा विचार करताय? जतन व संवर्धनाच्या कामामुळे ही 3 मंदिरे महिनाभर बंद राहणार आहे.

    अष्टविनायक मंदिर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    पिंपरी : अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या जतन, संवर्धन व दुरुस्ती कामांच्या पार्श्वभूमीवर मोरगाव येथील श्री मयुरेश्वर मंदिर, थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिर आणि सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायक मंदिर १० मे ते नऊ जून २०२६ या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.

    अष्टविनायक मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला असून , पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही कामे सुरू आहेत . मागील दोन महिन्यांपासून तिन्ही मंदिरांमध्ये मुख्य गाभारा, सभामंडप व मंदिर परिसरातील दगडी बांधकामाचे जतन आणि संवर्धनाचे काम प्रगतिपथावर आहे.

    Maharashtra TimesPune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमाचा भयंकर शेवट; आधी प्रियकराने तरुणीला संपवायचा प्रयत्न केला, पण नंतर त्याचाच अंत!
    या कामादरम्यान भाविकांची गर्दी आणि सततचा वावर यामुळे कामात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुरातत्त्व विभागाने याबाबत सह धर्मादाय आयुक्तांकडे विनंती अर्ज केला होता . चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

    Maharashtra TimesPune Crime: पुण्यात ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या तरुणीचा मृत्यू; रस्त्याच्या कडेला सापडली बॉडी, पोस्टमार्टम रिपोर्टमधून कारण समोर
    महत्त्वाचे…

    – नित्य पूजा सुरू : मंदिरे दर्शनासाठी बंद असली तरी ‘ श्रीं ‘ ची नित्य पूजाअर्चा व इतर धार्मिक विधी सुरू राहतील .
    – थेट दर्शन बंद : या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही .
    – प्रवेशावर निर्बंध : मंदिराचे पुजारी , बांधकाम यंत्रणा , अधिकृत अधिकारी , कर्मचारी व विश्वस्त यांच्याशिवाय अन्य कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा