Jalna Gunaratna Sadavarte Car ink Throw : जालन्यात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाई आणि सुपारी फेक केली आहे.
जालना गुणरत्न सदावर्ते कार शाईफेक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
योगेश काकफळे, जालना : जालना शहरात आज ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून शाहीफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी सुपाऱ्याही फेकल्याची माहिती समोर आली असून या प्रकारामुळे शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ही घटना शहरातील विशाल कॉर्नर चौफुलीवर घडली.
गाडीवर शाईफेक करत सुपाऱ्या फेकल्या
मिळालेल्या माहितीनुसार, ॲड. गुणरत्न सदावर्ते हे आज जालना शहरालगत असलेल्या गुंडेवाडी येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते आपल्या कुटुंबीयांसह वाहनानं जालना शहराकडे परत येत होते. त्याचवेळी विशाल कॉर्नर चौफुली परिसरात काही मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाला अडवत जोरदार घोषणाबाजी केली आणि अचानक गाडीवर शाहीफेक केली. काही कार्यकर्त्यांनी सुपाऱ्याही फेकल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. दरम्यान, ॲड. सदावर्ते यांनी अलीकडेच राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत हा निषेध व्यक्त केल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. Sushma Andhare : ‘शरद पवारांनी केलेलं वक्तव्य सत्य करुन दाखवलं’, विकास लवांडेंवरील शाईफेक हल्ल्यानंतर सुषमा अंधारेंची तिखट प्रतिक्रिया
पोलिसांची घटनास्थळी धाव
घटना घडली त्यावेळी ॲड. सदावर्ते यांच्या गाडीत त्यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र, सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. ॲड. गुणरत्न सदावर्ते तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. शाईफेक करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून ते मनसेचे कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. Pune News : गाडी अंगावर आली अन् महिलेने ट्रॅकवर झोपून वाचवला जीव; पाटस रेल्वे स्थानकावरील थरार कॅमेऱ्यात कैद या घटनेनंतर जालना शहरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विविध राजकीय पक्षांकडूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एका बाजूला मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाची चर्चा सुरू असताना दुसऱ्या बाजूला राजकीय मतभेद व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारच्या घटना योग्य नसल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे जालना जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा