• Sat. Jun 6th, 2026

    शाईफेकीनंतर शरद पवारांचा फोन, विकास लवांडेंनी हकीकत सांगितली, रोहित पवारांचा आक्रमक इशारा

    शाईफेकीनंतर शरद पवारांचा फोन, विकास लवांडेंनी हकीकत सांगितली, रोहित पवारांचा आक्रमक इशारा

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झाल्याच्या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली. तसंच त्यांना धमकी देण्यात आल्याचा आरोपही करण्यात येतोय. हे प्रकरण आता शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचलंय. झालं असं की लवांडेंवर झालेल्या शाईफेकचा निषेध करण्यासाठी आमदार रोहित पवार हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी रोहित पवारांनी शरद पवारांना फोन लावून दिला असता लवांडेंनी घडलेला प्रकार सांगितला. आम्ही विकास लवांडे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत, असं म्हणत रोहित पवारांनी शाईफेक प्रकरणाचा निषेध व्यक्त केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed