Rohit Pawar on Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणात गुन्हा दाखल झालाय पण, आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यास नकार दिलाय. त्यामुळे रोहित पवारांनी थेट इशारा दिलाय.
रोहित पवार ऑन विकास लवांडे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे यांच्याकडून शाईफेक हल्ला केल्याची घटना घडली. यावेळी आपणास ठार मारण्याची धमकीही देण्यात आल्याचं लवांडे यांनी सांगितलं. या शाईफेकीचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, याप्रकरणात, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विकास लवांडे यांनी केली आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही पोलीस ठाण्यात जाऊन थेट पोलिसांना आणि सरकारला इशारा दिला आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवरही पोस्ट केली आहे.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्याच्या गुंडांनी केलेला हल्ला आणि शाईफेकीसंदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पोलिसांची भेट घेतली. लवांडे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली तरीही दबावाखाली असलेल्या पोलीस प्रशासनाने यासंदर्भातील आर्म ॲक्ट नुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. यावरुन पोलिसांवर किती दबाव आहे हेच दिसून येतं. असं असेल तर या गुन्ह्याचा तपास खरंच पारदर्शक पद्धतीने होईल का आणि भर दिवसा कायद्याला न जुमानता मस्ती करणाऱ्या गुंडांविरोधात कारवाई होईल का, याविषयी आमच्या मनात शंका आहे. पण या गुन्ह्याच्या तपासाकडं आमचं लक्ष राहिल. तसंच लवांडे यांच्या केसालाही धक्का लागला तर त्याची पूर्ण जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची राहील, याची सरकारने नोंद घ्यावी.
या हल्ल्याच्या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे दुसऱ्या राज्यातून येऊन अनेक भोंदूबाबा जगद्गुरु संत तुकाराम महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीचं आणि आक्षेपार्ह बोलतात त्यावेळी हे भोंदू मूग गिळून बिळात लपून बसतात. आजच्या हल्ल्याने बंधूभाव, शांतता आणि समता प्रस्थापित करणाऱ्या वारकरी संप्रदायात स्वतःला वारकरी म्हणून घेणाऱ्या कट्टरतावादी गुंडांनी घुसखोरीच केली, हे सिद्ध झालं. त्यामुळं भविष्यात संतांचा खरा विचार जपण्यासाठी या घुसखोरांविरोधात संघर्ष करण्याची वेळ आली, हे सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा