• Sat. Jun 6th, 2026
    Nanded Crime : ‘तू मला खूप आवडतेस, माझ्यासोबत आली नाहीतर…’; भावाकडून बहिणीचा छळ, बदनामी झाल्यानं विवाहितेचं टोकाचं पाऊल

    Nanded Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नांदेडमधून एक मोठी घटना समोर आली आहे. एका विवाहितेनं आपलं आयुष्य संपवलं आहे.

    नांदेड लोणी विवाहित महिलेची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड जिल्ह्यात बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी तथा संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नात्यानं भाऊ असलेल्या तरुणाकडून सतत छळ होत असल्यानं एका 21 वर्षीय विवाहित तरुणीने विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. ‘तू मला आवडतेस, तू माझ्यासोबत आली नाहीस, तर मी तुझा संसार मोडतो’, अशी धमकी आरोपी भावाकडून दिली जात होती. बदनामीच्या भीतीनं विवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं. अर्धापूर तालुक्यातील लोणी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अर्धापूर पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ऋतुजा सुधीर लोणे असं आयुष्य संपवलेल्या विवाहितेचं नाव आहे.

    ‘तू मला आवडतेस…’

    मयत विवाहिता ही अर्धापूर तालुक्यातील लोणी खुर्द या गावातील रहिवासी आहे. नुकताच तिचा विवाह झाला होता. विवाहित असताना देखील गावातील प्रफुल लोणे या तरुणाकडून तिचा सतत छळ सुरु होता. ‘तू मला आवडतेस, तू माझ्यासोबत आली नाहीस, तर मी तुझा संसार मोडतो’, अशी धमकी विवाहितेला तरुण देत होता. विशेष म्हणजे ऋतुजा ही प्रफुल याची नात्याने बहीण लागत होती. बहीण भावाचं असताना देखील तरुणाकडून मानसिक छळ सुरु होता. याची भनक ऋतुजाच्या माहेरी आणि सासरच्या मंडळींना लागली.
    Maharashtra Times‘Nida Khan हिने माझ्याकडे मदत मागितली असती तर मी सुद्धा केली असती’, इम्तियाज जलील यांचं मोठ वक्तव्य

    विवाहितेचं पार्थिव विहिरीत

    माहेरी आणि सासरी आपली बदनामी झाल्यानं विवाहित महिलेनं गावातील राजेश लोणे यांच्या विहिरीत उडी मारून आपल्या आयुष्याची दोर कापली. आपली मुलगी घरी दिसत नसल्याने आई वडिलांनी तिचा शोध सुरु केला. काही तासानंतर तिचं पार्थिव विहिरीत आढळून आलं. विवाहित महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून अर्धापूर पोलिसांनी प्रफुल सुनील लोणे विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले हे करीत आहेत. दरम्यान, या घटनेनं खळबळ उडाली असून विवाहितेच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा