• Sun. Jun 7th, 2026

    Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमाचा भयंकर शेवट; आधी प्रियकराने तरुणीला संपवायचा प्रयत्न केला, पण नंतर त्याचाच अंत!

    Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमाचा भयंकर शेवट; आधी प्रियकराने तरुणीला संपवायचा प्रयत्न केला, पण नंतर त्याचाच अंत!

    Pimpri Chinchwad Murder Case: अचानक झालेल्या हल्ल्यात प्रियकर तरुण गंभीर जखमी झाला. तरुणाच्या हातावर, पोटावर व मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले.

    पिंपरी-चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड: पिंपरी- चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमातून थरारक हत्याकांड घडलं आहे. पाच महिन्यांपूर्वी ज्या तरुणाने आपल्या प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केला होता, त्याच तरुणाची आता चाकू आणि चॉपरने हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून काळेवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन आरोपींना अटक केली आहे.

    मृत तरुणाचं नाव सुभान अमित शेख असं आहे. सुभानचं शहरातील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. मात्र, सदर तरुणी त्याला सातत्याने नकार देत होती. या नात्याला तरुणीच्या आईचाही तीव्र विरोध होता. पोलिसांच्या माहितीनुसार, पाच महिन्यांपूर्वी सुभानने संतापाच्या भरात तरुणीवर चाकूने वार करत तिच्या हत्येचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती आणि तो जेलमध्ये होता.

    दरम्यान, अवघ्या पाच दिवसांपूर्वीच सुभान जामिनावर जेलमधून बाहेर आला होता. तो पुन्हा आपल्या मुलीला इजा पोहोचवू शकतो, अशी भीती सदर तरुणीच्या आईला वाटत होती. त्यामुळे त्यांनी आपल्या परिचयातील विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांना याबाबत माहिती दिली होती. तसेच, “आमच्या मुलीचा नाद सोड, अन्यथा परिणाम वाईट होतील,” अशी धमकीही सुभानला देण्यात आल्याचं समोर आलं आहे.

    गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांनी सुभान शेख आणि त्याचा साथीदार अर्षद रमजान शेख यांच्यावर चाकू आणि चॉपरने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात सुभान गंभीर जखमी झाला. त्याच्या हातावर, पोटावर आणि मानेवर सपासप वार करण्यात आले.

    रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुभानला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि काही तासांतच विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांना अटक केली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास काळेवाडी पोलीस करत आहेत.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा