• Sat. Jun 13th, 2026
    Nida Khan : निदा खानला लपवणारा MIM नगरसेवक मतीन पटेल याच्यावर गुन्हा, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

    निदा खान हिला काल पोलिसांनी गुप्तपणे छापा टाकून छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. तिला स्थानिक एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल हिने आश्रय दिल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून कोणत्याही क्षणी मतीन पटेल याला अटक केली जाण्याची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला काल रात्री अटक केली. नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव येथे अत्यंत गुप्तपणे जात सिनेस्टाईल अटक केली. निदा खान ही गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होती. पोलिसांकडून तिचा युद्ध पातळीवर शोध सुरु होता. ती पोलीस पकडायला येथील या भीतीने आपली जागा बदलत राहत होती. अखेर पोलिसांना तपासातून महत्त्वाची माहिती मिळाली होती. निदा खान ही छत्रपती संभाजीनगरमध्ये लपून बसल्याची शंका पोलिसांना होती. त्यानुसार पोलिसांनी गुप्तपणे तपास करत नरेगाव येथे एका फ्लॅटमध्ये छापा टाकला. यावेळी निदा खान तिथे असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी तिला पळून जाण्यासाठी कोणतीही संधी दिली नाही. तिला जेरबंद करण्यात आलं.

    याच प्रकरणात आता निदा खान हिला इतके दिवस आश्रय कोणी दिला? याबाबत महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास केला जात आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी केलेल्या तपासात एका एमआयएम पक्षाच्या नगरसेवकाने निदा खान हिला आश्रय दिल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या नगरसेवकालादेखील या प्रकरणात सहआरोपी करण्यात आलं आहे. तसेच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरचे एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या विरोधात गुन्हेगारांना आश्रय दिल्याप्रकरणी बीएनएस कलम 249 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    नाशिक पोलीस आयुक्त काय म्हणाले?

    याबाबत नाशिक पोलीस आयु्क्त संदीप कर्णिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नाशिक शहर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर 156/26 या केसमध्ये आरोपी निदा खान हिचा जामीन न्यायालयाने फेटाळला होता. नाशिक शहर पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या संयुक्त कारवाईने काल आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन पटेल यांनी निदा खान हिला आश्रय दिल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आलं आहे. मी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया नाशिक पोलीस आयु्क्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे.

    पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?

    नाशिक पोलिसांच्या SIT तपासामध्ये आरोपीस नारेगाव येथील स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल याने आश्रय दिल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी संशयित परिसरात गुप्त पाळत ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात केली. तसेच मतीन पटेल याचीही पोलिस पथकांकडून चौकशी करण्यात आली.आरोपीचे अचूक ठिकाण निश्चित झाल्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी विनाचिन्हांकित वाहनांचा वापर करून नारेगाव परिसरात अत्यंत वेगवान व नियोजनबद्ध कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.

    सदर आरोपीस आज नाशिक न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तसेच नारेगावचे नगरसेवक मतीन पटेल यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असून, आरोपींना आश्रय देणारे व कायदेशीर प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्या सर्व व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.नाशिक पोलीस, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार तसेच छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त करीत आहेत.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा