• Thu. Jun 11th, 2026
    Siblings Drown Death: एकाच दिवशी जन्म, मृत्यूही एकसाथच! जुळ्या बहीण-भावाने तलावात बुडून गमावला जीव, पुणे जिल्हा हळहळला

    Junnar Siblings Drown Death: तळेरान येथील पाझर तलावात बुडून ११ वर्षीय जुळ्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

    जुळ्या बहीण-भावाचा तलावात बुडून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, जुन्नर : तळेरान (ता. जुन्नर) येथे पाझर तलावात बुडून ११ वर्षीय जुळ्या बहीण-भावाचा मृत्यू झाला. गेल्याच आठवड्यात बल्लाळवाडी येथे शेततळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आठवडाभरात चार मुले बुडाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

    श्रावणी साबळे आणि गणेश साबळे अशी मृत्यू झालेल्या बहीण-भावाची नावे आहेत. दोन्ही मुले आदिवासी प्रकल्पाच्या घोडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये निवासी शाळेत शिकत होती. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ते घरी आले होते. मुलांचे वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत असून, त्यांना मोठ्या तीन मुली आणि धाकटी जुळी बहीण-भावंडे अशी पाच मुले होती.

    Maharashtra TimesPune Crime: पुण्यात पुन्हा चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न; पर्वती पायथा येथे नागरिकांचा संताप, आरोपीला चोपलं
    मृत मुलांची मोठी बहीण कपडे धुण्यासाठी तळेरानच्या वसईवाडी पाझर तलावावर गेली होती. त्यानंतर ही दोन्ही भावंडे तिच्या पाठोपाठ तळ्यावर गेली. तळ्यातील पाण्यात उतरली असता, अंदाज न आल्याने दोघे बुडाली. हे पाहून मोठ्या बहिणीने आरडाओरडा केला. पोहता येत नसल्याने ती मदत करू शकली नाही. जवळ कोणी नसल्याने मुलांना वाचवता आले नाही.

    घटनेची माहिती समजल्यानंतर ग्रामस्थ आले; परंतु, तोपर्यंत ही दोन्ही मुले बुडाली होती. पाण्यात शोधाशोध केल्यानंतर पहिल्यांदा श्रावणीचा मृतदेह सापडला आणि काही वेळाने गणेशचा मृतदेह सापडला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले.
    Maharashtra TimesPune Crime : गहू खरेदीला बोलावलं, मग पिस्तूल रोखून लुटलं; पोलिसांनी दरोडेखोरांना फिल्मी स्टाईलने पकडलं
    तर दुसऱ्या एका घटनेत, जागेच्या वादातून झालेल्या मारहाण आणि पत्नीच्या विनयभंगाच्या घटनेचा धक्का सहन न झाल्याने गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष शाहीद इनामदार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आबेदा इनामदार व त्यांच्या कुटुंबीयांसह एकूण ११ जणांविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी सकाळी आझम कॅम्पससमोरील ट्रस्टच्या आवारात घडली. याबाबत शाहीद इनामदार यांचा मुलगा मुस्तफा इनामदार (वय ३१, रा. नाना पेठ) यांनी तक्रार नोंदवली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा