• Sun. Jun 14th, 2026

    Mumbai-Pune Expressway’s Missing Link: मिसिंग लिंक बनलाय ‘सेल्फी पॉइंट’! पोलिसांच्या आदेशानंतरही प्रवाशांचा बेफिकीरपणा सुरूच; 3 दिवसांत 98 जणांवर कारवाई

    Mumbai-Pune Expressway’s Missing Link: मिसिंग लिंक बनलाय ‘सेल्फी पॉइंट’! पोलिसांच्या आदेशानंतरही प्रवाशांचा बेफिकीरपणा सुरूच; 3 दिवसांत 98 जणांवर कारवाई

    Missing Link: शुक्रवारी मिसिंग लिंकचं लोकार्पण झाल्यानंतर सोमवार ते शनिवार दरम्यान तब्बल 98 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. संख्या कमी नाही झाली तर कठोर पावले उचलणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

    मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’चे 1 मे रोजी, महाराष्ट्र दिनी लोकार्पण झाले. त्यानंतर 2 मेपासून मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. पण त्यानंतर मिसिंग लिंकवर गाड्या थांबवून फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी प्रवासी थांबू लागले. त्यामुळे पोलिसांनी पुलावर थांबणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याची घोषणा केली. पण त्यानंतरही नव्या मार्गाची भुरळ पडलेले नागरिक पुलावर गाडीतून खाली उतरून फोटो काढण्याचे प्रकार कमी होत नाही आहेत. गेल्या 3 दिवसांत महामार्ग वाहतूक पोलिसांनी 98 जणांवर कारवाई करून दंड आकारला आहे.

    सेल्फी पॉइंटची भुरळ

    मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकमुळे प्रवासात वेळ वाचत आहे. खोल दरीवर उभारलेला पूल प्रवाशांसाठी आकर्षण ठरत आहे. परंतु, हेच आकर्षणामुळे अपघातांना निमंत्रण देण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी पोलिसांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. तरीही नागरिक बैफिकरीने महमार्गावर थांबत असून रस्त्याकडेला फोटो, सेल्फी काढत आहे. कारवाईच्या आदेशानंतर हे प्रकार कमी होण्याची आशा होती. पण उलटच घडले. 2 मे (शनिवार) ते 4(सोमवार) मेदरम्यान पोलिसांनी तब्बल 98 प्रवाशांना फोटो काढताना पकडलं असून त्यांच्यावर कारवाई केली आहे.Maharashtra TimesMumbai-Pune Missing Link : मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’वर सेल्फी अन् फोटो काढण्यास मज्जाव, अन्यथा महागात पडणार; पोलिसांकडून मोठी कारवाई

    खोपली एक्झिट आणि सिंहगड इन्सिट्यूटदरम्यान असलेल्या 19.8 किमी लांब द्रुतगती महामार्गाऐवजी प्रवासासाठी दुसरा पर्याय उपलब्ध झाला आहे. घाटातील धोकादायक वळणांऐवजी प्रवासी आता केवळ 13.3 किमी लांब मार्गावरून प्रवास करत आहेत. मिसिंग लिंकवर व्हायाडक्ट, टायगर व्हॅलीवर 650 मीटर लांब केबल-स्टेड पूल आणि सह्याद्रीच्या डोंगरांमधूल तब्बल 9 किमी लांब जुळ्या बोगद्यांचा समावेश आहे. यामुळे द्रुतगती महामार्गाचे अंतर 6 किलोमीटरने कमी होणार आहे. प्रवासात 20 ते 25 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

    या मिसिंग लिंकमुळे घाटात होणाऱ्या अपघातांची संख्या कमी होईल अशी आशा होती. पंरतु, 600 फूट खोल दरीवर बांधलेल्या पुलावर मध्येच थांबून ही संख्या पुन्हा वाढण्याची भीती आहे. या मार्गावरील मुंबई ते पुण्याच्या दिशेने जाणारा छोटा बोगदा बोरघाटाजवळ असून रायगड वाहतूक पोलिसांच्या हद्दीत येतो.

    Maharashtra TimesMumbai Underground Tunnel: गिरगाव चौपाटीपर्यंत बोगद्याचा विस्तार होणार! ‘ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह’ भुयारी मार्गाचा नवा प्लॅन मंजूर; 5 मिनिटांत प्रवास

    कठोर कारवाई करण्याचा इशारा

    रायगड विभागाच्या महामार्ग पोलिसांनी पुलावर बेपर्वाईने थांबलेल्या प्रवाशांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती दिली. या केबल-स्टेड पुलावर थांबणे प्रवाशांसाठी आणि थांबणाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण करत आहेत. उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी कारवाई सुरू केली असून लोक थांबत राहिल्यास कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

    2 मेपासून पोलिसांनी कारवाई करण्याचे आदेश देताच पहिल्याच दिवशी 15 प्रवाशांना दंड ठोठावण्यात आला. दुसऱ्या दिवशी 3 मे रोजी 52 आणि 4 मे, सोमवारी 31 प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. प्रत्येक वाहनचालकाडून 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. भविष्यात ही कारवाई अजून तीव्र करण्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा