• Sat. Jun 6th, 2026
    15 फेऱ्या बाकी, तरी 77 हजारांची लीड; सुनेत्रा पवारांचा विक्रमी विजय निश्चित; तरी म्हणाल्या, गुलाल उधळू नका, कारण…

    Baramati By-Election Results 2026 Updates : दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये, असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी केलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    बारामती : उपमुख्यमंत्रिपदावर असताना अजित पवार यांचे पुण्यात विमान अपघातात निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. अजित दादांच्या पत्नी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असून सुरुवातीच्या फेऱ्यांमध्येच त्यांनी विजय निश्चित केला. मात्र इतका मोठा विजय मिळवूनही कुठलाही जल्लोष न करण्याचं आवाहन सुनेत्रा पवार यांनी केलं आहे. एक्स सोशल मीडियावरुन सुनेत्रा पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

    आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करुया, असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी केलं.
    Maharashtra TimesThalapathy Vijay : अभिनेत्री त्रिशा बर्थडेसाठी तिरुपतीला; चाहते म्हणाले, विजयच्या ‘विजया’साठी मंदिरात, ‘थलपती’ची पिछाडीने सुरुवात
    दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची! असं ट्वीट सुनेत्रा पवार यांनी केलं आहे.

    सुनेत्रा पवार यांना किती मतं?

    पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच सुनेत्रा पवार यांनी विजयी आघाडी घेतली. नवव्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांना 78 हजार 528 मतं मिळाली आहेत. इतरांना मिळालेली एकूण मतं 1 हजार 425 इतकी आहेत. सुनेत्रा पवारांना नवव्या फेरीतच 77 हजारांची लीड मिळाली आहे.

    Missing Link नव्हे कनेक्टींग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण अन् उद्धव ठाकरेंना टोमणा

    नवव्या फेरीत
    एकूण झालेले मतदान – 8022
    सुनेत्रा पवार – 7886
    इतर मते – 136
    Maharashtra TimesWest Bengal Election Results 2026 : झालमुरीमुळे भाजपला विजयाची चव? मोदींनी भेट दिलेल्या भागात ‘कमळ’ फुलण्याचे संकेत, दीदी पराभवाच्या छायेत

    पारंपरिक राजकीय गड

    बारामतीच्या पोटनिवडणुकीला भावनिक आणि राजकीय अशा दोन्ही बाजूंनी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूतीची लाट, तसेच बारामतीतील पारंपरिक राजकीय वर्चस्व या पार्श्वभूमीवर बारामतीतील पोटनिवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. बारामतीत राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली, तेव्हापासून सुनेत्रा पवार यांची आघाडी कायम आहे. मतमोजणीसाठी ३०० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा