• Sat. Jun 6th, 2026

    Indorikar Maharaj: लेकीचं लग्न मोठं का केलं? लग्नात मठ्ठा, गुलाबजाम ठेवला की नाही? स्वत: इंदोरीकर महाराजांनीच सर्व हिशोब मांडला!

    Indorikar Maharaj: लेकीचं लग्न मोठं का केलं? लग्नात मठ्ठा, गुलाबजाम ठेवला की नाही? स्वत: इंदोरीकर महाराजांनीच सर्व हिशोब मांडला!

    Ahilyanagar News: विवाहसोहळ्यात बोलताना इंदोरीकर महाराज भावुक झाल्याचे दिसून आले. त्यांनी 32 वर्ष केलेल्या कष्टाचा हिशोबच मांडला.

    लेकीच्या लग्नात भाषण करताना इंदोरीकर महाराज भावुक, ट्रोलर्सना उत्तर देत विवाहसोहळ्याचा सर्व हिशोबच मांडला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मोबीन खान, संगमनेर (अहिल्यानगर): प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा विवाह रविवारी संगमनेर येथे साहिल चिलप यांच्यासोबत मोठ्या थाटामाटात पार पडला. या शाही विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री आणि राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत वधू-वरांना आशीर्वाद दिले. यावेळी इंदोरीकर महाराज यांनी टीकाकारांनी उत्तर देत आपली भूमिका मांडली.

    “माझ्या मुलीच्या साखरपुड्याची चर्चा महिनाभर चालली, आता लग्नाची चर्चा वर्षभर आरामशीर चालेल. बऱ्याच लोकांची शंका आहे इंदोरीकर महाराज लोकांना सांगतात आणि स्वतःच्या मुलीचा लग्न मोठं का केलं? त्याचं उत्तर असं आहे की ज्याची परिस्थिती आहे, ज्याला संतांनी दिलं, ज्याच्यावर ज्ञानोबारायांची कृपा आहे त्याने जरूर मोठं लग्न करावं,” असं स्पष्टीकरण इंदोरीकर महाराज यांनी दिलं आहे. तसंच “बऱ्याच लोकांची उद्या एक शंका राहील की, या माणसाने मुलाचा लग्न सोहळा इतका मोठा का केला? तर त्याचं उत्तर असं आहे की, आमची मुलगी आणि मुलगा हे मोठे झाले तुम्हाला आज दिसतं. पण आम्ही दोघे कीर्तनकार असताना माझ्या मुलांना वडिलांचं सुख कधी मिळालं नाही. तीन महिन्यांची मुलगी असताना आम्ही दुसऱ्याच्या घरात तिला ठेवून कीर्तनं केली. माझ्या मुलाचा दहावीपर्यंत माझ्याशी संपर्क आला नाही. माझा मुलगा नामदेव शास्त्री यांच्याकडे शिकायला आहे. शास्त्रींना विचारा मी तीन वर्षांमध्ये माझ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा भेटायला गेलो नाही,” असे भावनिक उद्गारही यावेळी इंदोरीकर यांनी काढले.

    पुढे बोलताना इंदोरीकर महाराज म्हणाले की, “मी ३२ वर्ष रात्रंदिवस मेहनत करून रक्ताचे पाणी करून, ६ तास बोलून, ७०० ते ८०० किलोमीटर प्रवास करून आम्ही कुटुंब चालवलं. नुसतं कुटुंब नाही चालवलं तर समाजाला देण्याबाबतही आम्ही कुठेच कमी पडलो नाही. एक रुपयाही न घेता आत्तापर्यंतच तेराशे जणांना नोकरी देणारी एखादी संस्था महाराष्ट्रात दाखवा. ती संस्था माझ्याकडे आहे. पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण मोफत देतो तरी मला ट्रोल केलं जातं,” अशी खंत इंदोरीकर महाराजांनी व्यक्त केली.

    लग्नात मठ्ठा, गुलाबजाम का ठेवले नाहीत?

    इंदोरीकर महाराज कीर्तनांमधून अनेकदा विवाहसोहळ्यात ठेवल्या जाणाऱ्या मठ्ठा आणि गुलाबजाम या पदार्थांवरून आपल्या खास शैलीत तिरकस भाष्य करत असतात. त्यामुळे त्यांच्या मुलीच्या लग्नात हे पदार्थ ठेवले जाणार का, याबाबत चर्चा रंगत होती. यावर बोलताना इंदोरीकर महाराज म्हणाले की, “मी कीर्तनात मठ्ठ्यावर बोलत असतो. त्यामुळे या लग्नातील सर्व कार्यक्रमातून मी मठ्ठा वजा करून टाकला. त्यामुळे त्यावर बोलण्याचा आता तुम्हाला अधिकार नाही. दुसरं म्हणजे लग्नातील जेवणात लांब आकाराचे गुलाबजाम असणार की नाही, असंही विचारलं जात होतं. पण मी तेही ठेवले नाहीत. त्यामुळे आता त्यावरही बोलण्याचा प्रश्न नाही,” असं म्हणत इंदोरीकर महाराजांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा