Pune Accident News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्याती नऱ्हेमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका 22 वर्षीय निष्पाप तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
नऱ्हे पिगारा हॉटेल अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यातील नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. महामार्ग क्रमांक चारवर आज सोमवारी सकाळी सुमारे 8.05 वाजता हॉटेल पिगारासमोर झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. या अपघातात एका 22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे.
नेमका कसा झाला अपघात?
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कंटेनर क्रमांक MH 04 MH 6303चा चालक इम्रान अब्दुल जमादार हा मुंबईकडे भरधाव वेगाने वाहन चालवत होता. त्याचवेळी समोरील बाजूने जात असलेल्या पिकअप वाहन क्रमांक MH 42 AQ 6142ला त्याने मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पिकअपचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. दोन्ही कंटेनरच्यामध्ये हा पिकअप अडकल्यामुळे चालकाला बाहेर निघता आले नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. Ratnagiri Crime : ‘तुमच्या गाडीचा नंबर पाहिलाय, तुम्हाला…’; कोकणात फिरायला गेलेल्या मुंबईतील व्यापारी कुटुंबाला मारहाण, कार अडवून जीवघेणा हल्ला
एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
या दुर्घटनेत पिकअप चालक महादेव उत्तम शेंडे (वय 22 वर्ष) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याच वाहनातील त्याच्यासोबत असलेला मित्र सुमित दत्तू कांबळे (वय 22 वर्ष, रा. कवकुटे, ता. इंदापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने सिंहगड रोड येथील मोरया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.
पुढच्या तिन्ही वाहनांना धडक
दरम्यान, या अपघाताचा परिणाम फक्त एका वाहनापुरता मर्यादित राहिला नाही. धडकेनंतर पुढे असलेल्या टाटा आयशर वाहन क्रमांक MH 46 DC 3799 यालाही धक्का बसल्याने तिन्ही वाहनांचा अपघात झाला. त्यामुळे महामार्गावर काहीवेळ मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सकाळच्या व्यस्त वेळेमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. Paithan News : स्वप्नातील घर अधुरेच राहिले, लग्नासाठी आलेल्या हरिओमचा करुण अंत; लग्नघरात शोककळा घटनेची माहिती मिळताच नऱ्हे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सर्व वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. तसेच घटनास्थळी पंचनामा करून अपघाताचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात निष्काळजी आणि वेगाने वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महामार्गावर सतत वाढणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांनी अधिक काळजी घेणे गरजेचं असल्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. पुढील कायदेशीर कारवाई नऱ्हे पोलिसांकडून सुरू आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा