• Tue. Jun 16th, 2026

    Pune News: सेल्फीचा नाद जीवावर बेतला; 2 दिवसांत 6 जणांचा बुडून मृत्यू, मावळ तालुक्यातील दुर्दैवी घटना

    Pune News: सेल्फीचा नाद जीवावर बेतला; 2 दिवसांत 6 जणांचा बुडून मृत्यू, मावळ तालुक्यातील दुर्दैवी घटना

    Maval Drowning Accident: शुक्रवारी (एक मे) पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. यामध्ये नवलाख उंब्रे येथील जाधववाडी धरणात तिघांचा, लोणावळ्यातील वलवण धरणात दोघांचा आणि पवन मावळातील साळुंब्रे गावच्या हद्दीत पवना नदीपात्रात एकाचा मृत्यू झाला आहे.

    सहा जणांचा बुडून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी/लोणावळा: मावळ तालुक्यात दोन दिवसांत सहा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटना तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असून, कामगार दिनी तीन कामगारांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

    जाधववाडी येथे सेल्फी काढण्याच्या नादात तिघे मित्र बुडाले. अजय गारुडे, अनिकेत पवार आणि संतोष येडके (तिघेही रा. भोसरी) अशी त्यांची नावे आहेत. वलवण धरणात योगेश पालवे (वय ३०, रा. कुरवंडे, लोणावळा), यश कुलदीप धनोरिया (वय १३, रा. लोणावळा) यांचा मृत्यू झाला. मनोज भारत गौतम (वय २५, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे पवन मावळातील साळुंब्रे गावच्या हद्दीत पवना नदी पात्रात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

    Maharashtra TimesNasrapur Girl Death : चिमुकलीवर अखेर अंत्यसंस्कार, चार तासांनंतर नवले पूलावरील वाहतूक पूर्वपदावर; नसरापूर आंदोलकांना पोलिसांनी हटवलं
    अजय गारुडे, अनिकेत पवार आणि संतोष येडके हे तीन मित्र भोसरी एमआयडीसीत एका खासगी कंपनीत कामाला होते. मूळचे परभणीचे असलेले हे तरुण अन्य मित्रांसोबत एक मे च्या कामगार दिनाच्या सुट्टीचे औचित्य साधून फिरायला गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास तिघांनीही धरणात उतरून पोहण्याचा निर्णय घेतला आणि पोहण्याचा आनंद लुटू लागले. पोहताना त्यांनी पाण्यात एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवत सेल्फी काढू लागले. यावेळी सेल्फी काढणाऱ्याचा पाय निसटला आणि तो पाण्यात बुडू लागला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना तेही खोल पाण्यात खेचले. त्या तीन मित्रांचा इतर मित्रांच्या डोळ्यादेखत धरणाच्या खोल पाण्यात बुडाले. त्यांच्या इतर मित्रांनी त्यांना वाचवण्यासाठी आरडाओरड केला. आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली; परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आपत्कालीन पथकाला तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

    याच दिवशी साळुंब्रे गावच्या हद्दीत पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या मनोज गौतम या तरुणाचाही बुडून मृत्यू झाला. तर, गुरुवारी (३० एप्रिल) लोणावळ्याजवळील कुरवंडे येथील योगेश पालवे आणि एका विद्यालयातील सातवीच्या वर्गात शिकणारा १३ वर्षीय विद्यार्थी यश धनोरिया हा हरविल्याची तक्रार दाखल केली होती. हा विद्यार्थी आपल्या दोन मित्रांसह फिरायला जात असल्याचे विद्यालयातील सीसीटीव्हीत दिसत होते. त्या अनुषंगाने यंत्रणेने त्याच्या मित्रांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता ते विद्यालयापासून काही अंतरावर असलेल्या वलवण धरणाकडे फिरायला गेले असल्याचे समजले. मित्रांनी सांगूनही त्याने त्यांच्या ऐकण्याकडे दुर्लक्ष करून पोहण्यासाठी पाण्यात उतरला आणि त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पथकाने दोघांचे मृतदेह बाहेर काढले.
    Maharashtra TimesSunetra Pawar : ‘एक आई म्हणून…’; सुनेत्रा पवारांनी धायरीतून मुख्यमंत्री फडणवीसांना लावला फोन, नराधमाच्या फाशीसाठी सीएमसोबत थेट चर्चा
    निष्काळजीमुळे अपघात
    दरम्यान, उन्हाळ्यामुळे सध्या नद्या, धरणे, ओढे नाले व इतर जलस्रोताच्या ठिकाणी गर्दी होऊ लागली आहे आहे. मात्र, अशा ठिकाणच्या जलस्रोताच्या पाण्याच्या तळातील खोलीचा अंदाज येत नसल्याने आणि नदीतील पाण्याच्या प्रवाहाचा व खोलीचा अंदाजाची माहिती नसल्यामुळे असे जीवघेणे अपघात घडत आहेत

    रेस्क्यू ऑपरेशन आणि मदतकार्य…
    या दुर्घटनानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि एनडीआरएफच्या पथकाने तातडीने बचावकार्य केले. अथक प्रयत्नांनंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. रेस्क्यू टीमचे हे योगदान महत्त्वाचे होते. या मोहिमेत नीलेश गराडे, अनिल आंद्रे, भास्कर माळी, विनय सावंत, कमल परदेशी, शुभम काकडे, विकास दोड्डी, भारत मेहेंदळे, अनिश गराडे, कमलेश राक्षे, सर्जेस पाटील, विकी दौंडकर, अविनाश कार्ले, रवी कोळी, कुंदन भोसले, हर्षद काळोखे, राजू सय्यद, करण भांगरे; तसेच विरा अॅम्बुलन्स टीमने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

    नागरिकांना आवाहन
    उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये धरण, नदी परिसरात फिरताना विशेष काळजी घ्यावी. पाण्याची खोली, प्रवाह आणि सुरक्षिततेची साधने यांची खात्री करूनच पाण्यात उतरावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा