• Sat. Jun 6th, 2026

    Vadhavan Port: वाढवण बंदराला चालना! पालघर जिल्ह्यातील 124 ग्रामस्थांनी स्वेच्छेने जमीन सोपवली; कसा होणार बंदराचा विकास?

    Vadhavan Port: वाढवण बंदराला चालना! पालघर जिल्ह्यातील 124 ग्रामस्थांनी स्वेच्छेने जमीन सोपवली; कसा होणार बंदराचा विकास?

    India’s First Offshore Port: देशातील महत्वाकांक्षी वाढवण बंदरावरील पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग मिळणार आहे. पालघर जिल्ह्यातील हे बंदर 2034पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पालघर: जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाला अखेर वेग मिळाला आहे. पालघरमधील 124 ग्रामस्थांनी सरकारी अटी मान्य करून स्वच्छेने त्यांच्या जमिनीची ताबा जिल्हा प्रशासनाकडे सोपवला आहे. त्यामुळे देशाला जागतिक सागरी व्यापारात मोठी झेप घेण्यासाठी निर्णायक ठरणाऱ्या या प्रकल्पाचे काम आता सुरू होणार आहे.

    अधिकाऱ्यांनी जमीनमालकांच्या समस्या सोडवल्या

    जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वरोर गावात सुमारे असून त्यामध्ये 49 उपविभाग आहेत. वाढवण बंदरावरील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हे पार्सल अत्यंत महत्त्वाचं ठरणार. जमीन सर्वेक्षणामधील अडथळ्यांमुळे हे काम यापूर्वी रखडलं होतं. पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी या विकासाचे वर्णन प्रशासन आणि स्थानिकांमधील ‘विश्वासाचा घडा ‘म्हणून केले आहे. या वेळी वरिष्ठ जिल्हाधिकाऱ्यांनी या जमीनींना प्रत्यक्ष भेट देऊन बाधित जमीन मालकांशी संवाद साधला.Maharashtra TimesVidarbha Express: नागपूरपर्यंतच धावणार ‘विदर्भ एक्स्प्रेस’! रेल्वे ट्रॅकच्या नूतनीकरणामुळे निर्णय; वेळापत्रक कधी बदलणार?

    यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी सल्लामसलत करून त्यांच्या समस्या दूर केल्या. या चर्चेमुळे प्रशासन आणि स्थानिकांमध्ये एकमत निर्माण करून ही प्रक्रिया सुरळीत करण्यात मदत झाली असल्याचा त्यांना विश्वास आहे. दरम्यान, जमीन मालकांनी प्रशासनाच्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले आहे. अधिकाऱ्यांनी त्यांच्या चिंता ऐकण्यासाठी वेळ घऊन पारदर्शक आणि व्यावहारिक उपाय दिले होते.

    या प्रक्रिये 124 जमीन मालकांनी दिवाणी खटल्याचा पाठपुरावा न करता थेट प्रशासनाकडे जाऊन नुकसान भरपाईशी संबंधित समस्या सोडवल्या. नुकसान भरपाईच्या रकमेवर शिक्कामोर्तब करून जमीनीचा ताबा देत त्यांनी प्रकल्पाला पाठिंबा देण्यास आपली तयारी दर्शवली.

    कसा होणार बंदराचा विकास?

    पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळ उभारण्यात येत असलेल्या वाढवण बंदराला सर्व ऋतूत वापरू शकणारा ग्रीनफिल्ड बंदर म्हणून विकसित केलं जात आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या मिळून हा प्रकल्प राबवविला जात आहे. या बंदरामध्ये प्रत्येकी 1,000 मीटरते नऊ कंटेनर टर्मिनल, चार बहुउद्देशीय बर्थ, चार लिक्विड कार्गो बर्थ, एक रो-रो बर्थ आणि एका तटरक्षक बर्थचा समावेश असेल.

    Maharashtra TimesMumbai-Pune Expressway’s Missing Link: प्रवाशांना ‘कनेक्टिंग लिंक’ची भुरळ! घाटातला रस्ता ओस; मुंबई-पुणे प्रवास सुस्साट

    वाढवण बंदर समुद्रातील 1,448 हेक्टर जमिनीसह 10.14 किलोमीटर ऑफशोअर ब्रेकवॉटरवर उभारण्यात येणार आहे. यासह मालवाहतुकीच्या साठ्यासाठी एक युनिटसुद्धा असेल. 30 ऑगस्ट 2024रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 76,220 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. कार्यान्वित होताच, वाढवण बंदर जागति स्तरावरील पहिल्या 10 कंटेनरच्या बंदरांपैकी एक म्हणून ओळखले जाणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा