Supriya Sukle On Nasrapur Bhor Incident : नसरापूर येथील चिमुकलीच्या हत्या प्रकरणानंतर सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा द्या आणि एक उदाहरण सेट करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. या प्रकरणातील नराधमाला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असली, तरी जनमानसातील संताप शांत झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला खडेबोल सुनावले असून, “आम्हाला आश्वासन नको, ॲक्शन पाहिजे,” अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे.
नराधमाला बेल मिळालीच कशी?
सुप्रिया सुळे यांनी आरोपीच्या गुन्हेगारी इतिहासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “हा या नराधमाचा तिसरा गुन्हा आहे. मग पहिल्या आणि दुसऱ्या गुन्ह्यानंतर त्याला जामीन मिळालाच कसा? जर त्याला पहिल्याच वेळी फाशी झाली असती, तर आज आमच्या दोन लेकी वाचल्या नसत्या का?” असा सवाल त्यांनी विचारला. संबंधित आरोपीला त्याच्या स्वतःच्या गावातून हाकलून दिले होते, तरीही तो नसरापूरमध्ये आलाच कसा, याकडेही त्यांनी पोलिसांचे लक्ष वेधले.
उदाहरण सेट करावे
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात फास्ट ट्रॅक केसेससाठी विशेष कोर्ट नसल्याचा मुद्दा सुळे यांनी उचलून धरला. “केवळ आश्वासन देऊन उपयोग नाही. साध्या कोर्टात हे खटले चालवल्यामुळे विलंब होतो. आम्हाला तातडीने निकाल आणि नराधमाला फाशीची शिक्षा हवी आहे, अशा आरोपींना तातडीने फाशी देऊन महाराष्ट्र सरकारने उदाहरण सेट करावे” असे सुळे यावेळी म्हणाल्या.Pune Crime : 1998 आणि 2015 मध्येही तो सुटला, पण आता… नसरापूरच्या नराधमाला पोलिसांनी झटपट कसं पकडलं? नराधमाचे दोन जुने कांड उघड
मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून मंगळवारी त्या सर्व ग्रामस्थांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. “मुख्यमंत्री स्वतः वकील आहेत आणि राज्याचे गृहमंत्रीही सक्षम आहेत, त्यांच्याकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात संतापाची लाट
दरम्यान, आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. “आरोपीला आमच्या ताब्यात द्या, पीडितेच्या पालकांच्या हस्ते त्याला फाशी द्या,” अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. आज रोहित पवार आणि सुनेत्रा पवार यांनीही पीडित कुटुंबाची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा