Ahilyanagar News: इंदोरीकर महाराज यांच्या कन्या ज्ञानेश्वरी देशमुख यांच्या लग्नसोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून १०० एकर परिसरात हा सोहळा पार पडणार आहे.
इंदोरीकर महाराज पुन्हा चर्चेत! तब्बल १०० एकर जागेवर मुलीच्या लग्नसोहळ्याची तयारी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मोबीन खान, संगमनेर (अहिल्यानगर) : प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी व नवी मुंबईतील उद्योजक सुनिल चिलप यांचे पुत्र साहिल यांचा उद्या रविवारी ३ मे रोजी संगमनेरमध्ये शाही विवाहसोहळा होणार आहे. गुंजाळवाडी परिसरातील तब्बल 100 एकर जागेत या भव्य विवाह सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विवाहपूर्व गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून त्यानंतर कीर्तन आणि विवाह सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राजकीय दिग्गज नेत्यांना आणि संत-महंतांना निमंत्रण देण्यात आलं असून तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
साध्या पद्धतीने लग्न करण्याचा संदेश देणारे इंदोरीकर महाराज आता मुलीच्या शाही विवाह सोहळ्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या त्यांच्या कन्येच्या भव्य साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर इंदोरीकर महाराज यांना ट्रोल करण्यात आलं होतं. “उपदेश एक आणि आचरण दुसरं”, “लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण”, असं म्हणत नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
दरम्यान, इंदोरीकर महाराज यांनी मुलीच्या साखरपुड्यावर झालेल्या टीकेनंतर साखरपुड्यापेक्षा लग्न अधिक भव्यदिव्य करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आता उद्या होणाऱ्या ज्ञानेश्वरी देशमुख यांच्या विवाहसोहळ्याची तयारी जोरात सुरू असून संपूर्ण परिसरात मोठा सोहळा पार पडणार आहे.
विशेष म्हणजे याच दिवशी गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रमही पार पडणार आहे. त्यानंतर कीर्तनपुष्प आणि मग मुख्य विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या शाही सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, अनेक राजकीय नेते, तसेच संत-महंतांना निमंत्रण देण्यात आलं असल्याने या विवाह सोहळ्याकडे राज्यभरातील लोकांचं लक्ष लागलं आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा