Missing Link On Lane Closed: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ मार्ग अंशतः खुला करण्यात आला असून, केवळ मुंबई-पुणे लेन सुरू करण्यात आली आहे, पुण्याहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जुन्या घाट रस्त्यावरून परत वळावे लागले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कनेक्टिंग लिंकचा रस्ता उभारण्याकरिता दरीत १८२ मीटर उंचीचे दोन स्तंभ (पायलॉन) आणि एकूण २४० केबल्सच्या सहाय्याने उभारलेला केबल स्टेड पूल हा ताशी २४० कि.मी.चा वारा झेलण्यास सक्षम आहे. त्यामुळे ताशी १३० ते १५५ कि.मी. वारे वाहिलेल्या ‘निसर्ग’ वादळाएवढ्या तीव्रतेच्या वादळाचाही त्यावर परिणाम होणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी लोकार्पणानंतर प्रसारमाध्यमांना दिली. तसेच, उद्घाटनानंतर वाहतुकीसाठी केवळ एक बाजू खुली करण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
‘हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकी चमत्कार आहे. त्यात जगातील सर्वाधिक रुंदीच्या बोगद्यांमुळे (२३.५० मीटर) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधील नोंदीने जागतिक विक्रम प्रस्थापित झाल्याने मानाचा तुराही खोवला आहे’, असे त्यांनी आवर्जून सांगितले. सन २००२पासून टप्प्याटप्प्याने सुरू झालेल्या या द्रुतगती मार्गावर आर्थिक व तांत्रिक अडचणींमुळे ही जोडणी बांधता आली नव्हती. परिणामी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४वरील सुमारे १९ कि.मी. रस्त्याचे रुंदीकरण करून त्याचा वापर द्रुतगती मार्गाचा सामायिक भाग म्हणून करण्यात आला. त्यामुळे घाट परिसरात नेहमी वाहतूककोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत होता. सन २०१५मध्ये हा प्रकल्प राबवण्याचे ठरल्यानंतर २०१८मध्ये त्याला मान्यता देण्यात आली. याविषयी फडणवीस यांनी सविस्तर माहिती देतानाच प्रकल्पाची वैशिष्ट्येही प्रसारमाध्यमांना सांगितली.
वैशिष्ट्ये
सहा कि.मी.चे अंतर कमी आणि ३० मिनिटांची बचत
कोट्यवधी रुपयांची इंधन बचत
दरीत उभारलेला देशातील सर्वांत उंच ‘केबल स्टेड’ पूल
प्रती सेकंद ७० मीटर वेगाचा वारा झेलण्याची पुलाची क्षमता
‘विंड टनेल मॉडेल’च्या माध्यमातून पुलाची उभारणी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ‘सुरक्षेची नवी ढाल’!
मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवरील ‘कनेक्टिंग लिंक’ प्रकल्पात आता सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची भर पडली आहे. देशातील पहिली अत्याधुनिक ‘प्रीकास्ट काँक्रीट क्रॅश बॅरिअर’ प्रणाली या मार्गावर बसवण्यात आली आहे.
गोदरेज एन्टरप्रायझेस ग्रुपने ऑस्ट्रियातील डेल्टाब्लॉक या आघाडीच्या कंपनीच्या सहकार्याने ही प्रणाली कार्यन्वित केली आहे. अपघातावेळी वाहनांचा वेग नियंत्रित ठेवत त्यांना सुरक्षितपणे मार्गावरच रोखणे आणि प्रवाशांना होणारी शारीरिक इजा कमी करणे यासाठी या बॅरिअरची रचना करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर सिद्ध झालेली डेल्टाब्लॉक प्रणाली युरोपियन ‘ईएन१३१७’ यांसारख्या कठोर आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांची पूर्तता करते. ‘भारताच्या पायाभूत सुविधांच्या पुढील टप्प्यात सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे.
Pune-Mumbai Expressway: ‘मिसिंग लिंक’नंतर MSRDCचा गेमचेंजर प्लॅन! ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’ दहा पदरी होणार; भूसंपादन प्रक्रिया सुरू
डेल्टाब्लॉकच्या माध्यमातून आम्ही जागतिक स्तरावर यशस्वी ठरलेले तंत्रज्ञान भारतात आणले आहे,’ असे गोदरेज एन्टरप्रायझेस ग्रुपचे ईव्हीपी आणि बिझनेस हेड अनूप मॅथ्यू यांनी सांगितले. बांधकामात पुनर्वापर केलेल्या साहित्याचा वापर करण्यात आला असून पर्यावरणपूरक पद्धतींना चालना देण्याचा प्रयत्न आहे.
पुणे-मुंबई मार्ग बंद?
दरम्यान, मिसिंग लिंकवर केवळ मुंबई-पुणे वाहतूक सुरू असून पुणे-मुंबई लेन अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांमध्ये निराशा व्यक्त केली जात आहे. या मार्गावर काही कामं शिल्लक असून सुरक्षा चाचण्या पूर्ण होताच येत्या 2-3 दिवसांत हा मार्ग सुरू करण्यात येणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा