Nasrapur minor girl murder case : भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याची तयारी सुरू आहे, पालिसांनी आरोपीबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती समोर आणली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये घडलेल्या अल्पवयीन चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला असताना, या प्रकरणात पोलिसांनी केलेली जलद कारवाई लक्षवेधी ठरली आहे. अवघ्या काही तासांत आरोपीपर्यंत पोहोचत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. या संदर्भात माहिती देताना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच तपास यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने संशयिताची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर अल्पावधीतच आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
अमानुष कृत्याने सर्वत्र संताप
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, आरोपीने चिमुकलीला फूस लावून एका गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून नंतर दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या अमानुष कृत्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीवर POCSO Act तसेच खूनासह इतर गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सध्या आरोपीची सखोल चौकशी सुरू असून गुन्ह्याचे सर्व पैलू तपासले जात आहेत.
गुन्हेगारी भूतकाळ समोर
दरम्यान, तपासादरम्यान आरोपीचा गुन्हेगारी भूतकाळही समोर आला आहे. १९९८ आणि २०१५ मध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते, मात्र तो त्यातून मुक्त झाला होता. त्यामुळे पोलिसांकडून त्याच्या पार्श्वभूमीचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली असून नागरिक रस्त्यावर उतरल्याचेही दिसून आले. पोलिसांनी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन करत तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे. तसेच या प्रकरणात लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
नागरिकांमध्ये अस्वस्थता
या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली तत्परता महत्त्वाची ठरत असली तरी, या क्रूर घटनेमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता कायम आहे. आता सर्वांचे लक्ष न्यायालयीन प्रक्रियेकडे लागले असून आरोपीला कठोर शिक्षा होण्याची मागणी जोर धरत आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा