• Sun. Jun 14th, 2026

    Mumbai News: 348 रुपयांचा पास थेट 10 हजारांवर! नॅशनल पार्कमध्ये ‘मॉर्निंग वॉक’साठी अव्वाच्या सव्वा दरवाढ; विरोधानंतर तात्पुरती स्थगिती

    Mumbai News: 348 रुपयांचा पास थेट 10 हजारांवर! नॅशनल पार्कमध्ये ‘मॉर्निंग वॉक’साठी अव्वाच्या सव्वा दरवाढ; विरोधानंतर तात्पुरती स्थगिती

    Sanjay Gandhi National Park: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (एसजीएनपी) 1 मे पासून लागू होणाऱ्या तिकीट दरवाढीला स्थगिती देण्यात आली आहे. नियमित चालणाऱ्यांनी ही वाढ अन्याअयकारक आणि त्रासदायक असल्याचे म्हटले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: शहरातील अनेक नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जातात. पण काही दिवसांपूर्वी वॉकसाठी आकारण्यात येणारा शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. 1 मे पासून हे शुल्क आकारण्यात येणार होते. पण नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर सध्या या दरवाढीला स्थगिती देण्यात आली आहे. सुधारीत दरांमध्ये वार्षिक पासची किंमत तब्बल 10 हजार रुपये करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

    कोणत्या सुविधांचा समावेश?

    बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मार्गांवर 2 तासांच्या मॉर्निंग वॉकसाठी वार्षिक पासची किंमत 348 रुपयांवरून थेट 10,000 रुपये करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. उद्यानातील अधिकाऱ्यांच्या अधिकृत परिपत्रकामध्ये या दरवाढीबद्दल माहिती देण्यात आली होती. ऑपरेश्नल आवश्यकतांचा हवाला देत ही दरवाढ करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार, उद्यानातील प्रवेश शुल्क, वाहतुकीचा शुल्क आणि लोकप्रिय आकर्षणांचे दर लक्षात घेऊन ही रक्कम ठरवण्यात आली आहे. यामध्ये मार्गदर्शित टूर, सफारी सेवा, बस आणि मिनी ट्रेनसारख्या अंतर्गत वाहतूक प्रणालींच्या सुधारित किंमतींचाही समावेश आहे.Maharashtra TimesMumbai Water Cut: मुंबईत 30 तास पाणीपुरवठा बंद! 5 ते 6 मे रोजी सहा वॉर्डमध्ये परिणाम; कुर्ला, घाटकोपर, परळसह अनेक ठिकाणी फटका

    संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सर्व आकर्षणांचे शुल्क वाढवण्यात आले आहे. लायन आणि टायगर सफारीसाठीचे दर 250 रुपयांवरून 750 रुपये (लहान मुलांसाठी 125 ते 375 रुपये)करण्यात आले आहे. मिनी ट्रेनच्या प्रवासासाठी तिकिटांची किमंत 100 रुपयांवरून 300 रुपये करण्यात येईल. उद्यानापासून कान्हेरी लेणीपर्यंत घेऊन जाणाऱ्या बसच्या तिकिटांची किंमतही 100 रुपयांवरून 300 रुपये करण्यात आली आहे. प्रभात फेरीचे शुल्क दरमहा 1,000 रुपये आणि वर्षाला 10,000 रुपये करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना रमहा 500 रुपये आणि वार्षिक पाससाठी 5,000 रुपये मोजावे लागणार आहेत.

    हजारो नागरिकांना फटका

    बोरिवली, कांदिवली आणि दहिसरमधील तब्बल 3,000 ते 5,000 नागरिक दररोज सकाळी 5.30 ते 7.30या वेळेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्रभात फेरीसाठी येतात. वेळेची मर्यादा ओलांडल्यास दंडही आकारला जातो. लांब पल्ल्याच्या धावण्याचे प्रशिक्षण घेणारे खेळाडू उद्यानाच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रवेशद्वारापासून कान्हेरी लेण्यांपर्यंत सहा किमी पट्ट्याचा वापर करतात.

    मुंबईतील सर्वात प्रमुख पर्यावरणीय ठिकाणांपैकी एक असलेले संयज गांधी राष्ट्रीय उद्यान हजारो पर्यटकांना आकर्षित करतं. त्यामुळे उद्यानाच्या देखभालीला प्राधान्य दिले जाते. अधिकाऱ्यांच्या मते या पायाभूत सुविधा आणि उपक्रमांसाठी हे दर आवश्यक आहेत. पर्यावरणीय संतुलन राखताना पर्यटकांचा अनुभव अविस्मरणीय करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. सुधारित किंमतींसह उद्यानात सुविधा, सुरक्षेच्या उपाययोजना आणि जागरुकतेसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

    Maharashtra TimesMumbai News: गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, दहिसर-भाईंदर एलिव्हेटेड रोडमुळे प्रवास सुस्साट! मुंबईतील कोंडी फोडणारे मार्ग कधी सुरू होणार?

    प्रशासनाने 30 एप्रिल रोजी निर्णय स्थगित करण्यासाठी त्वरीत हालचाल केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुधारित प्रस्ताव अंतिम होईपर्यंत पूर्वीचे दर लागू राहतील, आता दरवाढीचा पुनर्विचार केला जात आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा