Maval drowning accident selfie death : पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये रविवारी मोठी दुर्घटना घडली. जाधववाडी धरणात सेल्फी घेताना ३ तरुणांचा, तर पवना नदीत एकाचा बुडून मृत्यू झाला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात रविवारी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणांवर काळाने झडप घातली आहे. जाधववाडी धरणात सेल्फी घेण्याच्या नादात भोसरीतील तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेने संपूर्ण मावळ तालुका हादरला आहे. तसेच, याच दिवशी पवना नदीतही एका तरुणाचा बळी गेला आहे. अशा प्रकारे मावळमध्ये एकाच दिवसात पाण्यात बुडून चार जणांचा मृत्यू झाल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमका घटनाक्रम काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अजय गारुडे, अनिकेत पवार आणि संतोष येडके अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे तिघेही पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथील रहिवासी होते. ते भोसरी एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामाला होते. मूळचे परभणीचे असलेले हे तरुण रविवारी मित्रांसोबत मावळमध्ये फिरण्यासाठी गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास हे सर्वजण जाधववाडी धरण परिसरात पोहोचले. उन्हाचा कडाका असल्याने त्यांनी पाण्यात उतरून पोहण्याचा निर्णय घेतला.
सेल्फी काढण्याचा प्रयत्न अन्..
सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असताना, या तरुणांनी पाण्यात उभे राहून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढत असताना सेल्फी काढणारा तरुण अचानक खोल खड्ड्यात घसरला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले इतर दोन मित्रही पाण्याच्या ओढीत खेचले गेले. काही क्षणातच हे तिघेही डोळ्यादेखत खोल पाण्यात बुडाले. इतर मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी आणि बचाव पथकाने तिथे धाव घेतली. मावळ वन्यजीव रक्षक आणि शिवदुर्ग संस्थेच्या पथकाने बराच वेळ शोधमोहीम राबवून तिघांचेही मृतदेह बाहेर काढले.
गौतमचाही दुर्दैवी अंत
दरम्यान, याच दिवशी पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या मनोज भारत गौतम या तरुणाचाही बुडून मृत्यू झाला. उन्हाळ्यामुळे सध्या नद्या आणि धरणांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, पाण्याचा आणि तळाच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने असे जीवघेणे अपघात घडत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात येत आहे की, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे टाळावे. या घटनेमुळे भोसरी परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा