May Heatwave And Monsoon Update : आयएमडीचा ताजा अंदाज जाहिर झाला आहे. त्यानुसार मे महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार असले तरी रात्रीच्या उकाड्यात वाढ होईल.
मे महिन्यात उन्हाचा पारा घसरणार, पण रात्रीची झोप उडणार! मान्सूनच्या आगमनाबाबतही हवामान खात्याची मोठी अपडेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी पुणे: देशात यंदा एप्रिलमध्ये तीव्र स्वरूपाचा उन्हाळा अनुभवायला मिळाला असला, तरी मे महिन्यात मात्र, कमाल तापमान काहीसे दिलासादायक राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये या महिन्यात कमाल तापमान सरासरीइतके किंवा त्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता असून, मान्सूनपूर्व पाऊस सरासरीपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.
उन्हाचा कडाका कमी, पण उकाडा वाढणार
आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी शुक्रवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत मे महिन्याचा हवामान अंदाज जाहीर केला. एप्रिलअखेरीस महाराष्ट्रासह मध्य आणि उत्तर भारतात सुरू झालेले उष्णतेच्या लाटांचे सत्र चालू आठवड्यात कमी होणार असल्याची शक्यता डॉ. महापात्रा यांनी वर्तवली. ते म्हणाले, ‘मे महिन्यात पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे; तसेच दक्षिण भारतातील वादळी पावसामुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. ढगाळ हवामानाचे दिवस जास्त राहण्याची शक्यता असल्याने देशाच्या बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी, तर रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. रात्रीचे तापमान जास्त राहिल्याने उकाड्यात मात्र, वाढ होऊ शकते.’
आयएमडीचा मासिक हवामान अंदाज काय?
आयएमडीच्या मासिक हवामान अंदाजानुसार, कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता राज्यात इतरत्र कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता जास्त आहे. विदर्भ वगळता इतर विभागांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबारपासून कोल्हापूर, सांगलीपर्यंतच्या मध्य महाराष्ट्राच्या पट्ट्यात मे महिन्यात उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहू शकतात.
तिसऱ्या आठवड्यात मान्सून अंदमानमध्ये?
आयएमडीच्या विस्तारित अंदाजानुसार, मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात (१४ ते २१ मे) हिंदी महासागरावर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर वाढण्याची शक्यता असून, याच काळात अंदमान- निकोबार बेटांवर मान्सून दाखल होऊ शकतो. अंदमानमध्ये मान्सून दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख २२ मे आहे. केरळमधील मान्सूनच्या आगमनाची तारीख १५ मेच्या दरम्यान; तर मान्सूनचा सुधारित दीर्घकालीन अंदाज मे अखेरीस जाहीर करण्यात येणार आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा