• Wed. Jun 17th, 2026

    Reservation News: महाराष्ट्रात SC आरक्षणाचं स्वरुप बदलणार; उपवर्गीकरणाचा महार समाजाला फटका? समितीकडून सरकारकडे महत्त्वाची शिफारस

    Reservation News: महाराष्ट्रात SC आरक्षणाचं स्वरुप बदलणार; उपवर्गीकरणाचा महार समाजाला फटका? समितीकडून सरकारकडे महत्त्वाची शिफारस

    Maharashtra Government: उपवर्गीकरणानंतर आरक्षणाचा अधिकचा टक्का मांग-मातंग समाजाला देण्यात यावा, अशी शिफारस बदर समितीच्या अहवालात करण्यात आल्याचे समजते.

    devendra fadnavis(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या न्या. बदर समितीचा अहवाल राज्य मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात आला असून, या उपवर्गीकरणाचा फटका महार समाजाला बसण्याची शक्यता आहे. या अहवालानुसार मांग- मातंग हा समाज अद्याप मागासच असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

    सन २०११मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेच्या आधारे ही पाहणी करण्यात आली. उपवर्गीकरण करताना एखाद्या गटातील प्रगत व मागास जाती कोणत्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, भविष्यामध्ये त्यानुसार आरक्षणाचा लाभ देण्याची शिफारस करण्यात येणार आहे. बदर समितीच्या निकषांनुसार या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये घेतलेल्या प्रवेशांच्या संख्येचा विचार करण्यात येणार असल्याचे समजते.

    अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्यासाठी राज्य सरकारने न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर (निवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालय, पाटणा) यांच्या अध्यक्षतेखालील एकसदस्यीय समिती स्थापन केली होती. समितीने शिफारशींसह १६ मार्च २०२६ रोजी अहवाल सरकारला सादर केला होता.

    दरम्यान, राज्य सरकारने जनतेकडून सूचना आणि हरकती मागविल्या असून, गुरुवारी त्याची अखेरची मुदत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास १५ हजारांच्या आसपास हरकती-सूचना मातंग समाजातून आल्याचे कळते, तर महार समाजाकडून त्या खालोखाल ई-मेल पाठविण्यात आले आहेत.

    मांग-मातंग समाज मागे

    न्या. बदर समितीचा अहवाल जाहीरच न केल्याने याविषयी कमालीची नाराजी एससी प्रवर्गात आहे. मात्र, विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अहवालाचा सर्वाधिक फटका महार समाजाला आणि काही प्रमाणात मेहतर समाजाला बसणार असल्याचे कळते. एससी प्रवर्गातील ५९ जातींच्या १३ टक्के आरक्षणाचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्यात येणार आहे. यासाठी २०११ची जनगणना आणि अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) कॉलेजात शिकणारे या जातींमधील विद्यार्थी यांची माहिती घेण्यात आल्याचे समजते.

    मिळालेल्या माहितीनुसार, सर्वाधिक प्रवेश हे महार त्यापाठोपाठ चर्मकार आणि सर्वांत शेवटी मांग-मातंग या समाजातील विद्यार्थ्यांनी घेतल्याचे आढळून आले. हा धागा पकडूनच उपवर्गीकरणात आरक्षणाचा अधिकचा टक्का मांग-मातंग समाजाला मिळावा, अशी शिफारसही बदर अहवालात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा