• Wed. Jun 17th, 2026
    Nashik Crime: देवळाली कॅम्पच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये चोरी; तब्बल 82 लाखांच्या इन्शुलिन इंजेक्शन्स गायब

    Nashik Crime: देवळाली कॅम्प मिलिटरी हॉस्पिटलमधून तब्बल ८१ लाख ९९ हजार रुपयांच्या इन्शुलिन इंजेक्शन्सची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ८२ लाखांच्या इन्सुलिन इंजेक्शची चोरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: देवळाली कॅम्प येथील मिलिटरी हॉस्पिटलसाठी पाठविलेल्या तब्बल ८१ लाख ९९ हजार रुपयांच्या इन्शुलिन इंजेक्शन्सची परस्पर चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी निलंबित लष्करी शिपायासह निवृत्त कर्मचाऱ्यावर देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    सुभेदार रामराव निवृत्ती शिंदे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. देवळाली मिलिटरी हॉस्पिटलसाठी मे २०२४ मध्ये मुंबईतील कांदिवली येथील आर्मी मेडिकल स्टोअर डेपोतून १३३ बॉक्समध्ये विविध औषधे पाठविण्यात आली होती . यात मधुमेह नियंत्रणासाठी वापरली जाणारी महागडी ‘ इन्शुलिन डेग्लुडेक ‘ आणि ‘ ह्युमन इन्शुलिन ‘ अशी एकूण १२ हजार ६६२ इंजेक्शन्स होती.

    Maharashtra TimesHeatwave Alert: तीव्र झळा, आरोग्य सांभाळा! नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; हवामान विभागाकडून अतिउष्णतेचा इशारा
    तत्कालीन लष्करी शिपाई नीरज सिंग (सध्या निलंबित) आणि निवृत्त कर्मचारी विनायक विठ्ठल कांबळे यांनी ही औषधे हॉस्पिटलमध्ये जमा न करता संगनमताने लंपास केल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यांनी ही औषधे देवळाली परिसरातील एका चाळीतील कांबळेच्या घरात उतरवली. तेथे मूळ बॉक्स फोडून औषधांचे पुन्हा पॅकिंग करण्यात आले . त्यानंतर ही औषधे टेम्पोद्वारे पुण्यातील कलाशंकरनगरातील नीरज सिंग याच्या घरी पाठविण्याचा कट रचण्यात आला. लष्करी गुप्तचर यंत्रणेने दोन वर्षे या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. गुन्हे शोध पथक तपास करीत आहे .
    Maharashtra TimesNashik MHADA Scam: म्हाडा घरकुल घोटाळ्यात 26 लेआउट रद्द; नगररचना विभागाचा बिल्डरांना दणका
    चोरीस गेलेली इंजेक्शन्स …
    इन्शुलिन डेग्लुडेक ९९२ – नग, १३,८८,८००₹
    अन्य इन्शुलिन ९७२ – नग, १५,९७,१२०₹
    ह्युमन इन्शुलिन १०,६९८- नग, ५२,१३,०००₹
    एकूण १२,६६२ – नग ८१,९९,०००२

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा