• Fri. Jun 5th, 2026
    Pune BJP: भाजपच्या दोन नगरसेविकांतील वाद चव्हाट्यावर; तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत, प्रकरण काय?

    BJP Women Corporators Clash: नगरसेविका अर्चना पाटील यांनी आपल्याच पक्षातील नगरसेविका मृणाल कांबळे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याने अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली.

    दोन नगरसेविकांतील वाद चव्हाट्यावर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरातील भारतीय जनता पक्षाच्या दोन महिला नगरसेविकांमधील वाद थेट पोलिस ठाणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्याने खळबळ माजली आहे.

    काही दिवसांपूर्वीच ‘टक्केवारी’च्या आरोपांवरून भाजपच्या दोन महिला पदाधिकार्ऱ्यांमध्ये महापालिकेत जोरदार खडाजंगी झाली होती. तो वाद शांत होत नाही, तोच नव्या संघर्षाने पुण्यातील भाजप नेतृत्वाची डोकेदुखी वाढवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग २२मधील नगरसेविका अर्चना पाटील आणि मृणाल कांबळे यांच्यात अनेक दिवसांपासून अंतर्गत संघर्ष सुरू होता.

    Maharashtra TimesSanjay Kakade: मुलाला आमदारकीसाठी राष्ट्रवादीकडून ऑफर? पक्षांतर करणार का? भाजपच्या संजय काकडेंनी मांडली रोखठोक भूमिका
    पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेपाची मागणी केली आहे. पक्षांतर्गत अनेकदा तक्रारी करूनही न्याय न मिळाल्याने पोलिसांत धाव घ्यावी लागल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.मृणाल कांबळे यांनी अर्चना पाटील यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘पाटील प्रसिद्धीसाठी असे आरोप करीत आहेत. विकासकामांत अडथळे आणण्यासाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंट सुरू आहे,’ असा आरोप कांबळे यांनी केला.

    मृणाल कांबळे यांनी आपले ‘मॉर्फ’ केलेले ‘व्हिडिओ’ हे सोशल मीडियावर पसरवून जाणीवपूर्वक बदनामी केली. पोलिस आयुक्तांच्या बैठकीतील विधाने फिरवून ती त्यांच्या तोंडी घालण्यात आली,’ असा दावा अर्चना पाटील यांनी केला आहे. -अर्चना पाटील, नगरसेविका

    अर्चना पाटील केवळ प्रसिद्धीसाठी असे आरोप करीत आहेत. विकासकामांत अडथळे निर्माण करण्यासाठी आणि राजकीय सहानुभूती मिळवण्यासाठी हा सगळा स्टंट सुरू आहे. –मृणाल कांबळे, नगरसेविका

    Maharashtra TimesPune Crime : गप्पांच्या ओघात काढलेला ‘तो’ एक शब्द जिवावर बेतला! पिंपरीत तरुणावर भयावह हल्ला; निगडीत काय घडलं?
    भाजपने पुण्यात काय तीर मारला?
    पुणे : ‘पुणेकरांनी भाजपला ११९ नगरसेवक दिले, त्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. त्यांनी फक्त ‘नमो-नमो’ म्हणावे, त्यांच्या नळाला पाणी येईल,’ अशी उपरोधिक टीका करून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी पुणे महापालिकेत भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येण्यासाठी त्यांनी नेमके काय तीर मारले, अशा प्रश्न उपस्थित केला. पुणे महापालिकेतील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाला बुधवारी भेट दिल्यानंतर राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर कथित अघोरी पूजा झाल्याच्या चर्चांवर त्यांनी भाष्य केले. ‘रोहित पवार यांनी अशा अंधश्रद्धेतून बाहेर पडले पाहिजे,’ असा सल्ला राऊत यांनी दिला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा