• Fri. Jun 5th, 2026
    मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचे धक्कादायक निकाल, दिवंगत सरपंच संतोष देशमुखांची पत्नी पराभूत

    Massajog Sarpanch Election :​मस्साजोगच्या गावकऱ्यांनी विरोधात कौल दिल्याने सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    सुनील जाधव, बीड : बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागल्याचे समोर आले आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी आणि सरपंचपद पोटनिवडणुकीच्या उमेदवार अश्विनी देशमुख यांना पराभवाचा धक्का बसला आहे. ग्रामपंचायत सदस्य स्वरुपानंद देशमुख पोटनिवडणुकी विजयी झाले आहेत. संतोष देशमुख यांच्या पत्नीचा 92 मतांनी पराभव झाला आहे.

    ८४ टक्के मतदान

    मस्साजोगच्या गावकऱ्यांनी विरोधात कौल दिल्याने सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मंगळवारी झालेल्या मतदानात एकूण 2080 मतदारांपैकी 1744 जणांनीनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानुसार एकूण 84 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर आज होत असलेल्या मतमोजणीनंतर विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे स्थानिकांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं होतं.

    बिनविरोध निवडणुकीची होती अपेक्षा

    खरंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा देशमुख कुटुंबीयांनी व्यक्त केली होती, परंतु मागच्या वेळी अवघ्या 9 मतांनी पराभूत झालेल्या स्वरुपानंद देशमुख यांनी यावेळी आपला अर्ज कायम ठेवल्याने पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते.
    Maharashtra TimesSharad Pawar : तरुण नेतृत्वाला एकत्र बसवलं, पवारांचे महत्त्वाचे संदेश? मोदीबागेत कौटुंबिक डिनरमागील राजकीय खेळीची चर्चा
    मस्साजोग येथे नेहमीच शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत असल्याचं सांगण्यात येतं. मंगळवारीही मतदान प्रक्रिया शांततेतच पार पडेल असं वाटत होतं, परंतु मतदान केंद्राबाहेर दोन गट आमनेसामने आल्याने काही वेळ गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

    रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; गुणरत्न सदावर्ते यांनी प्रताप सरनाईकांना डिवचलं

    संतोष देशमुखांची दीड वर्षापूर्वी हत्या

    बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे 44 वर्षीय तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्येपूर्वी त्यांचा निर्दयीपणे छळ करण्यात आला, ज्याचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते.
    Maharashtra TimesGayatri Devi : साताऱ्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ, औंधच्या राणी गायत्रीदेवी भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीचा हात सोडणार
    त्यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्याविरुद्ध स्वरूपानंद देशमुख अशी लढत मस्साजोगमध्ये झाली. मतदानावेळी गावात आणि मतदान केंद्र परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा