• Mon. Jun 15th, 2026
    भावंडांचं सुट्ट्यांचं प्लॅनिंग, बिर्याणी-ताकानंतर कलिंगड खाललं, चौघांच्या मृत्यूचं गूढ, कुटुंबीयांच्या मोबाईलमधले मेसेजही तपासणार

    Mumbai Watermelon Deaths : शनिवारी बिर्याणी, ताक आणि त्यानंतर कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबातील चौघांची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला. नेमक्या कोणत्या पदार्थामधून त्यांना विषबाधा झाली, याचा तपास आता पोलिस करत आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मोबाइल एक्ससरीजचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल्ला डोकाडिया यांच्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुलींच्या संशयास्पद मृत्यूमुळे हादरलेला पायधुनीचा परिसर अद्याप सावरलेला नाही. घटनेच्या दोन दिवसांनंतरही येथील गल्लीबोळात या कुटुंबीयांच्या मृत्यूचीच चर्चा होती. त्यातच डोकाडिया कुटुंबीय मुलांना सुट्ट्या पडल्याने एकत्र भेटण्याचा विचार करत होते. पाच भाऊ, दोन बहिणी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी स्नेहसंमेलनाची तयारीही सुरू केली होती, मात्र त्या आधीच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

    सुट्ट्यांचं प्लॅनिंग, आधीच काळाचा घाला

    पायधुनीच्या घाटीगल्लीमधील मुघल इमारतीत अब्दुल्ला, त्यांची पत्नी नसरीन आणि मुली आयेशा, जैनब हे राहत होते. शनिवारी बिर्याणी, ताक आणि त्यानंतर कलिंगड खाल्ल्यानंतर या सर्वांची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. नेमक्या कोणत्या पदार्थामधून त्यांना विषबाधा झाली, याचा तपास पोलिस करत आहेत. काही संशयास्पद आहे का, हे तपासण्यासाठी कुटुंबातील सर्वांचे जबाब घेत आहेत. त्यामध्ये हे सर्व कुटुंब अधूनमधून एकत्र येत असल्याचे कळले. मुलांना उन्हाळी सुट्ट्या पडल्याने या सर्वांचा एकत्र भेटून कुठेतरी जाण्याचा विचार सुरू होता. त्या दृष्टीने त्यांनी, विशेषतः मुलांनी, तयारीही सुरू केली होती, अशी माहिती समोर आली आहे.

    पोलिस वैद्यकीय अहवालावर अवलंबून

    चार मृत्यू असल्याने पोलिसांनी तपासासाठी तीन ते चार पथके तयार केली आहेत. मात्र घटना अन्न आणि विषबाधेशी संबंधित असल्याने पोलिसांच्या तपासाची दिशा सर्वस्वी वैद्यकीय अहवालावर अवलंबून आहे. चौघांची शवचिकित्सा, व्हिसेरा तपासणी, रासायनिक चाचण्या याचे अहवाल आल्यानंतर मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत स्पष्टता येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
    Maharashtra TimesMumbai News : ICU बेड नसल्याने स्ट्रेचरवर ठेवलं, उपचारावेळी खाली पडल्याने लेकीचा मृत्यू, कूपर हॉस्पिटलवर कुटुंबाचे आरोप

    Heat News | राज्यात तापमान ४५ पार, नागरिक हैराण, काय काळजी घ्यावी?

    मिळून मिसळून राहणारे कुटुंब

    जे. जे. मार्ग पोलिसांनी चौघांच्या मृत्यूनंतर मुघल इमारतीत राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबाचे शेजारी, त्यांचे नातेवाईक आणि अब्दुल्ला यांच्या भावांचे जबाब नोंदविले. पाच भाऊ आणि दोन बहिणी असा मोठा परिवार असून त्यांच्यात कोणतेही वादविवाद नसल्याचे आत्तापर्यंतच्या चौकशीतून समोर आले आहे. शेजाऱ्यांनीदेखील या कुटुंबाचा कधीच त्रास जाणवला नसल्याचे म्हटले आहे.

    Mumbai Watermelon Food Poison Death 2  Maharashtra Times

    अंधेरीत दुकाने बंद ठेवून आदरांजली

    अंधेरी येथील एका प्लाझामध्ये अब्दुल्ला यांचे मोबाइल एक्ससरीजचे दुकान आहे. अब्दुल्ला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मृत्यूचे वृत्त कळताच या प्लाझामधील वातावरण शोकाकुल झाले. येथील विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून अब्दुल्ला आणि त्यांच्या कुटुंबीयांना आदरांजली वाहिली.
    Maharashtra TimesMarine Drive Accident : कृष्णाने बाईक लांब नेऊ नये, बाबा नेहमी वापरायचे एक ट्रिक; बर्थडेच्या रात्री सूट दिली, देसाई कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण

    पोलिसांनी अब्दुल्ला आणि त्यांची पत्नी, तसेच मुलींचे मोबाइल फोन ताब्यात घेतले आहेत. या सर्व मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. काही संशयास्पद संदेश अथवा अन्य काही आहे का, याची पडताळणी केली जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा