• Sun. Jun 14th, 2026
    Nagpur Farmer : शेतकऱ्याच्या 10 वर्षांच्या संघर्षाला मोठं यश, ‘पोपट वन्यप्राणी नाही’ म्हणणाऱ्या वन विभागाला झटका

    ‘पोपट वन्यप्राणी नाही’, असं म्हणणाऱ्या वन विभागाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चांगलाच झटका दिला आहे. गेल्या 10 वर्षांपासून भरपाईसाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्याला न्यायालयाच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : “पोपट हा वन्यप्राणी नाही” या कारणावरून वन विभागाने नुकसान भरपाई नाकारल्याने एका शेतकऱ्याला तब्बल 10 वर्षे न्यायासाठी लढा द्यावा लागला. अखेर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वन विभागाची भूमिका फेटाळून लावत शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय दिला आहे. न्यायालयाने नुकसान भरपाई देण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. पोपट हा वन्यप्राणी असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. या निर्णयामुळे केवळ एका शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही, तर भविष्यातील अनेक प्रकरणांसाठीही दिशा ठरली आहे.

    वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील हिंगणी येथील शेतकरी अजय महादेव डेकाटे यांनी आपल्या शेतात डाळिंबाची बाग फुलवली होती. बाग फळधारणेला आली असताना पोपटांच्या थव्यांनी हल्ला चढवत संपूर्ण बाग उद्ध्वस्त केली. या नुकसानीमुळे डेकाटे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यांनी 2016 मध्ये वन विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र “पोपट हा वन्यप्राणी नाही” या कारणावरून त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.

    वन विभागाच्या या भूमिकेने संतप्त झालेल्या डेकाटे यांनी हार न मानता न्यायालयाची दारं ठोठावली. त्यांनी पुरावे गोळा करत जनहित याचिका दाखल केली. या प्रकरणात वन विभागाला पोपट वन्यप्राणी नाही हे सिद्ध करता आले नाही. दीर्घ सुनावणीनंतर अखेर न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत पोपट हा वन्यप्राण्यांच्या गटातच येतो, असे स्पष्ट केले.

    नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार शासनाने संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणे बंधनकारक ठरवले आहे. या निर्णयामुळे वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी हा मोठा विजय मानला जात आहे.

    या प्रकरणाकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, हा केवळ नुकसान भरपाईचा मुद्दा नसून शेतकरी आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाचा प्रश्न आहे. ग्रामीण भागात पोपट मोठ्या प्रमाणात ज्वारी, बाजरी, मका आणि डाळिंबासारख्या पिकांचे नुकसान करतात. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी काही पिके घेणेच बंद केले आहे. मात्र, या नुकसानीची दखल घेतली जात नव्हती. न्यायालयाच्या निर्णयामुळे आता पोपटांमुळे होणारे नुकसानही अधिकृतरीत्या मान्य झाले आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच वन विभागालाही आपली धोरणे पुन्हा तपासावी लागणार आहेत.

    अजय डेकाटे यांचा हा लढा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. न्याय मिळवण्यासाठी संयम आणि सातत्य महत्त्वाचे असते, असे त्यांचे म्हणणे आहे. तर त्यांच्या वकिलांनीही हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगत, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी न्यायालयाची भूमिका महत्त्वाची आहे. एकूणच, या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेतली गेली असून, पोपटासारख्या पक्ष्यांनाही वन्यजीव म्हणून मान्यता मिळाल्याने कायदेशीर स्पष्टता निर्माण झाली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा