• Sun. Jun 7th, 2026

    Marine Drive Accident: बर्थडे सेलिब्रेशन अखेरचं ठरलं! मुलगा रात्रभर बेपत्ता, आईबापाच्या जीवाला घोर, मरीन ड्राईव्ह अपघातात 19 वर्षीय कृष्णाचा मृत्यू

    Marine Drive Accident: बर्थडे सेलिब्रेशन अखेरचं ठरलं! मुलगा रात्रभर बेपत्ता, आईबापाच्या जीवाला घोर, मरीन ड्राईव्ह अपघातात 19 वर्षीय कृष्णाचा मृत्यू

    Mumbai Marine Drive Bike Accident: रात्री संपर्क होत नसल्याने पालकांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. सकाळी अपघातानंतर पोलिसांनी दुचाकीवरून कृष्णाची ओळख आणि पत्ता मिळवल्यानंतर त्याच्या घरी पोहोचले. त्यांनी अपघाताची माहिती कृष्णाच्या वडिलांना दिली.

    मरीन ड्राईव्ह अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई: मित्रांसोबत वाढदिवस साजरा करून येतो असे सांगून गेलेला कृष्णा मध्यरात्रीपर्यंत घरी न आल्याने आईवडील त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र कृष्णाने मोबाइल बंद केल्यामुळे पालकांची काळजी वाढली. मुलगा कुठे गेला असेल, या चिंतेत असतानाच सकाळी त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि पालकांना धक्का बसला.

    डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या कृष्णाने हट्ट करून काही दिवसांपूर्वी वडिलांकडून ‘केटीएम’ बाइक खरेदी केली होती. तो दुचाकी घेऊन दूरवर जाऊ नये यासाठी वडील दुचाकीमध्ये कमीच पेट्रोल ठेवत असत. रविवारी त्यांनी केवळ २०० रुपये पेट्रोलसाठी दिले होते, अशी माहिती आहे. सायंकाळी मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर कृष्णा घरी परतला नाही. त्यामुळे वडील फोन लावण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचा फोन बंद असल्याने त्यांनी काही मित्रांकडे चौकशी केली. त्यावेळी तो कुणाच्याच घरी नसल्याचे समजले.

    Maharashtra TimesAmol Mitkari: विधान परिषदेची जागा जय पवार यांना द्यावी! अमोल मिटकरींची ट्विट करत मागणी
    कृष्णा-चांदणीची ओळख कशी?
    कृष्णा हा मुलुंडचा, तर चांदणी कफ परेडची रहिवाशी होती. ते एकमेकांना कसे ओळखतात, याची पालक आणि पोलिसांनाही याची कल्पना नाही. चांदणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील एका खासगी कंपनीत टेलिकॉलर म्हणून नोकरी करते. पहाटे घरातून निघताना तिने दुचाकी घेतली होती; तिचा शोध पोलिस घेत आहेत.

    रात्रभर कृष्णाने केले काय?

    कृष्णा वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत मुलुंडमध्ये होता. पहाटे साडेपाचच्या सुमारास तो कफ परेडमध्ये चांदणीला भेटला. रात्रभर तो कुठे होता? त्याने काय केले? याचा तपास सुरू आहे.
    Maharashtra TimesMarine Drive Accident : भल्यापहाटे काळाची झडप, मॉर्निंग वॉकला आलेल्या वृद्धाला धडक, मुंबईतील मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
    मॉर्निंग वॉक जिवावर बेतला
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत झालेले किशोर लामणे हे गिरगाव येथे पत्नीसोबत वास्तव्य करतात. पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान मरिन ड्राइव्हवर ते गेल्या अनेक वर्षांपासून व्यायाम करण्यासाठी येत असत. पूर्वी ते पत्नीसोबत येत होते, मात्र पत्नीच्या पायांचे दुखणे सुरू झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून ते एकटेच येथे येत असत. मॉर्निंग वॉक आणि व्यायाम सोमवारी शेवटचा ठरला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा