• Sun. Jun 14th, 2026
    Solapur Crime : झोपेत पाय लागल्याने आईवरुन शिवीगाळ, दारुच्या नशेत मित्रालाच संपवलं; लग्नघरात दु:खाचं वातावरण

    Solapur Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सोलापूरमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

    सोलापूर मित्राची हत्या
    इरफान शेख, सोलापूर : सोलापूर शहरात किरकोळ कारणावरून हत्या झाली आहे. महेश गुरु सिद्धप्पा सावळतोटे (वय 21, रा. कलावती नगर, सोलापूर) या तरुणाची हत्या झाली आहे. सोमनाथ नागराज जवळकोटे (वय 31, रा. कलावती नगर, सोलापूर) असं आरोपीचं नाव आहे. महेश सावळतोटे आणि सोमनाथ जवळकोटे हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे होते. महेश सावळतोटे हा शनिवारी रात्री कलावती नगर येथे घरासमोर झोपला होता. सोमनाथ जवळकोटे हा दारूच्या नशेत जात असताना महेशच्या पायाला धक्का लागला. ‘मी झोपलो असताना मला पायाचा धक्का कसाकाय लागला?’, असा जाब महेश याने सोमनाथला विचारला, यावरून दोघांत वादविवाद झाला. महेश सावळतोटे याने सोमनाथला आईवरुन शिवी दिली. या कारणाने सोमनाथने संतप्त होऊन महेशच्या डोक्यात दगड घालून ठार केले.

    महेशच्या आतेभावाने पार्थिव ओळखला

    काल रविवारी सकाळी सोलापूर शहरातील एका खासगी तेलगू शाळेजवळ महेश सावळतोटे याचं पार्थिव रक्ताच्या थारोळ्यात पडलं होता. पार्थिव पडलं आहे, आणि हत्या झाली आहे, अशी माहिती पसरताच या खासगी शाळेच्या मैदानावर मोठी गर्दी झाली होती. एम.आय.डी.सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. महेश याचा आतेभाऊ सिद्धू माळी याने महेशचं पार्थिव ओळखलं आणि नातेवाईकांना माहिती दिली.
    Maharashtra TimesCrime News : 32 वर्षीय पत्नीचे शिक्षकाशी अनैतिक संबंध, 45 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं, संपत्तीसाठी छळाचा आरोप

    चुलत भावाचं लग्न अन् महेशची हत्या

    काल रविवारी सकाळी महेश सावळकोटे याच्या चुलत भावाचं लग्नकार्य होतं. घरातील सर्व सदस्य आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. शनिवारी हळदीचा कार्यक्रम उरकून जेवण करून महेश सावळकोटे हा झोपण्यासाठी घरी गेला होता. झोप लागून थोडाच उशीर झाला होता, तितक्यात सोमनाथ जवळकोटे दारूच्या नशेत जाताना महेशला धक्का लागला, यावरून वादविवाद झाला, आणि महेशने आईवरुन शिवी दिली. आईवरुन शिवी का दिली याचा जाब विचारत सोमनाथने महेशच्या डोक्यात दगड घालून ठार केले. लग्नकार्य असलेल्या घरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या हत्येची नोंद एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा