Mumbai Local Update: कल्याण-कसारा प्रवाशांना मोठा दिलासा! रेल्वेने तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेसह नव्या यार्डचे काम हाती घेतले आहे. यामुळे लोकलची संख्या वाढणार असून प्रवासाचा वेगही सुधारणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मुंबईतील प्रवासाचा प्रश्न नागरिकांसाठी कठीण बनत चालला आहे. अशावेळी कल्याण-कर्जत या मार्गावरील प्रवाशांची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. या मार्गासाठी आता रेल्वेने महत्त्वपूर्ण पावले टाकत नवी प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम म्हणून येथील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होण्यास मदत होणार आहे.
मुंबईमध्ये दररोज लोकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे साहजिकच गैरसोय होते आणि प्रवासी हैराण होतात. कल्याण-कसारा मार्गावरही प्रवाशांचे असेच हाल होत असल्याची तक्रार अनेक दिवसांपासून येत होती. त्यामुळे प्रशासनाने आता या मार्गावरील प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मार्गावरील प्रवाशांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले टाकली आहेत.
कल्याण-कसारा मार्गावरील गर्दीचा प्रश्न कसा सुटणार?
कल्याण-कसारा या मार्गावरील प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आता या मार्गावर अधिक लोकल सेवा सुरू करण्याची गरज भासत आहे. त्याच विचारातून खडी, आटगाव, वाशिंद आणि खडवली या स्थानकांदरम्यान नवे यार्ड तयार करण्याचा प्रस्ताव रेल्वेकडे देण्यात आला होता. त्यापैकी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेल्वेची जागा मोकळी आहे, त्या-त्या ठिकाणी प्रथमच यार्ड उभारण्यास मंजुरी मिळाली असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्यात आली आहे.
लोकल ट्रेनची संख्या वाढणार
सध्याच्या परिस्थितीत कल्याण ते कसारा या ठिकाणी तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे नव्याने तयार होत असलेल्या या मार्गिकेमुळे रेल्वे वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर खडी येथे तयार होत असलेल्या यार्डमुळे काही दिवसांतच लोकल ट्रेनची संख्या वाढवणे शक्य होणार आहे.
यार्डमध्ये काय असणार?
दरम्यान, आता प्रश्न असा पडतो की या यार्डमध्ये नेमके काय असणार? तर अप आणि डाउन अशा दोन्ही दिशांसाठी तीन अतिरिक्त लाईन टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे गाड्यांचे नियोजन अधिक सुटसुटीत होणार आहे. यामुळे मुंबईकर प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा आणि वेगवान होण्याची अपेक्षा आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा