• Sun. Jun 14th, 2026
    पुणे-मुंबई Expresswayवरील बोरघाट बनतोय ‘डेंजर झोन’; 3 महिन्यांत 13 जणांचा मृत्यू, अपघाताची कारणं समोर

    Pune Borghat Accident: द्रुतगती मार्गावर नव्याने साकारलेल्या ‘मिसिंग लिंक’चे उद्घाटन एक मे रोजी अपेक्षित आहे. ‘मिसिंग लिंक’मुळे छोटी वाहने आणि बसना बोरघाटाला पर्याय मिळाला असून, याबरोबरच घाटातील धोकादायक वाहतुकीचा मुद्दाही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

    बोरघाट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    कुलदीप जाधव, पुणे: पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील अपघातांपैकी निम्म्याहून अधिक अपघात बोरघाटात (अमृतांजन ते खालापूर) दहा किलोमीटरच्या अंतरात होत असल्याचे गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या घाटपट्ट्यात होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यू आणि गंभीर जखमींचे प्रमाणही लक्षणीय असल्याने संपूर्ण ‘एक्स्प्रेस वे’वर हा भाग सर्वाधिक धोकादायक ठरत आहे.

    ‘एक्स्प्रेस वे’वरील २०२३ ते २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीत अपघातांमध्ये बोरघाटात झालेल्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. २०२३मध्ये एकूण १५४ अपघातांपैकी १०६ अपघात बोरघाटात झाले होते, तर ६५ मृत्यूंपैकी ३९ मृत्यू याच पट्ट्यात नोंदले गेले. २०२४मध्ये अपघातांची संख्या १९१वर पोहोचली असून, त्यातील १०८ अपघात बोरघाटात झाले. या वर्षी ९० मृत्यूंपैकी ४२ मृत्यू घाटात झाले, तर १४३ गंभीर जखमींपैकी ५१ जण या भागात जखमी झाले. २०२५मध्ये अपघातांची संख्या १८७ होती, त्यापैकी ९१ अपघात घाटात झाले. ६८ मृत्यूंपैकी ३९ मृत्यू आणि १४० गंभीर जखमींपैकी २४ जखमी बोरघाटातील अपघातांमध्ये होते.

    Maharashtra TimesPrakash Abitkar: महाराष्ट्राने गमावले दोन मुख्यमंत्री! पतंगराव कदम, अजितदादांबाबत आबिटकरांचं वक्तव्य
    चालू वर्षात बोरघाट अधिक धोकादायक
    सन २०२६मध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचे दिसून येते. या कालावधीत एकूण ३६ अपघातांपैकी ३५ अपघात बोरघाटातच झाले आहेत. या अपघातांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी नऊ मृत्यू घाटात झाले आहेत. १६ गंभीर जखमींपैकी १२ जखमी बोरघाटातील अपघातांमध्ये नोंदवले गेले आहेत.

    Maharashtra TimesAmit Thackeray : ‘त्यांच्यात मुंबई बंद करण्याची ताकद नाही, मराठी रिक्षा चालक मुंबई सुरळीत ठेवतील’; अमित ठाकरेंचं वक्तव्य; म्हणाले, ‘गावी जा…’
    बोरघाटात होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात प्रामुख्याने अवजड वाहनांच्या बेशिस्तीमुळे होत असल्याचे दिसले आहे. आता ‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्यानंतर तेथून केवळ छोटी प्रवासी वाहने सोडली आणि घाटातून अवजड वाहने सोडल्यास चित्र नक्कीच बदलेल. ‘मिसिंग लिंक’ कार्यान्वित झाल्यानंतर संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करायला हवे. – तन्मय पेंडसे, वाहतूक अभ्यासक

    Maharashtra TimesPune News : टाकी स्वच्छ करण्यासाठी खाली उतरला, श्वास गुदमरल्याने त्याला वाचवण्यासाठी दुसराही उतरला; पुण्यात तीन कामगारांचा हृदयद्रावक अंत
    अपघातांची प्रमुख कारणे…
    -बोरघाटातील अपघातांमागे अनेक तांत्रिक आणि मानवी कारणांचा एकत्रित परिणाम दिसतो.
    -घाटातील तीव्र वळणे आणि लांब उतार यामुळे वाहनांवर नियंत्रण ठेवणे अवघड होते.
    -विशेषतः उतारावर वेग वाढल्यास चालकांना अचानक ब्रेक लावणे कठीण जाते.
    -वेगमर्यादेचे उल्लंघन हे अपघातांचे मोठे कारण ठरत आहे. जड वाहनांचे ब्रेक निकामी होणे ही एक समस्या.
    -ट्रक आणि कंटेनरला दीर्घ उतारावर सतत ब्रेक वापरावा लागल्याने गरम होऊन निकामी होण्याचे प्रकार घडतात.
    -धुके, पाऊस आणि कमी दृश्यमानता यांसारखे हवामानातील बदल अपघातांना कारणीभूत ठरतात.
    -रस्ता ओला असल्यास घसरण्याचा धोका वाढतो.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा