• Sat. Jun 6th, 2026

    Mumbai Crime: शुभमंगल ‘सावधान’! मुंबईतील तरुणीला लाखोंना गंडवून नवरदेव पळाला, ४ वर्ष काढलं वेड्यात, प्रकरण काय?

    Mumbai Crime: शुभमंगल ‘सावधान’! मुंबईतील तरुणीला लाखोंना गंडवून नवरदेव पळाला, ४ वर्ष काढलं वेड्यात, प्रकरण काय?

    Mumbai Crime: आर्थिक चणचण, व्यवसायात नुकसान अशी वेगवेगळी कारणे पुढे करीत कमलेश याने वासंतीकडे पैसे मागण्यास सुरुवात केली.

    मुंबई क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : कॉल सेंटरमध्ये काम करताना ४० वर्षीय महिलेची कमलेश दळवी या तरुणासोबत मैत्री झाली. हळूहळू जवळीक वाढली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. चार वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर अखेर दोघांचा मोठ्या थाटामाटात विवाह झाला. मात्र हा पती लग्नानंतर कधी पसार झाला, हे महिलेला कळलेच नाही. कमलेश केवळ आयुष्यातून निघून गेला नव्हता तर, त्याने जवळपास २८ लाखांचा गंडा तिला घातला होता.

    नेमकं प्रकरण काय?
    मुलुंड पूर्वेकडे राहणारी वासंती (बदललेले नाव) ही विक्रोळी येथील कॉल सेंटरमध्ये काम करत असताना तिची ओळख कमलेश दळवी याच्यासोबत झाली. मैत्री झाल्यानंतर कमलेशने त्याच्या पत्नीचे निधन झाल्याचे सांगत सहानुभूती मिळवत वासंतीशी जवळीक साधली. वासंती ही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असल्याने पाहून त्याने तिच्यावर प्रेम करीत असल्याचे सांगितले. तीन-चार वर्षांपासूनची मैत्री असल्याने वासंती हिने होकार दिला. प्रेमप्रकरणाबाबत घरीही सांगितले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचे ठरविले.

    Maharashtra TimesEl Nino Alert: भारतावर मोठं संकट! ‘एल निनो’मुळे हवामानात होणार उलथापालथ, काय सांगतो WMOचा अहवाल
    वासंती हिनेही त्याला वेळोवेळी पैसे दिले. सन २०२० ते २०२४ या कालावधीत तिने कमलेश याला २० लाख रुपये दिले. इतकी रक्कम दिल्यानंतर वासंती हिने लग्नासाठी तगादा लावला. याचदरम्यान भावाचा अपघात झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केल्याचे कमलेशने सांगताच वासंतीने दागिने गहाण ठेवून जवळपास आठ लाख रुपये दिले.

    Maharashtra TimesMarathi Compulsion : मराठी सक्तीवरुन संघर्ष, चालक संघटनांची गोरेगावमध्ये बैठक, तर मंत्रालयातही हाय व्होल्टेज बैठक
    लग्नात वराकडचे नातेवाईक गैरहजर

    मुलुंड येथे थाटात त्यांचे लग्न झाले. मात्र लग्नात कमलेशकडून कुणीच नातेवाईक नव्हते, त्यामुळे संशय होताच! त्यातच लग्नानंतरही राहण्यासाठी भाड्याने घर घेण्यास तो पैसे मागू लागला. त्यावेळी कमलेशकडे राहण्यास घरही नसल्याचे समजले. पितळ उघडे पडत असल्याचे पाहून कमलेश पसार झाला आणि वासंतीने नवघर पोलिस ठाण्यात तक्रार केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा