• Tue. Jun 16th, 2026
    लेकाचा गंभीर अपघात, ‘ब्रेन डेड’ घोषित; ‘माझा मुलगा दुसऱ्याच्या रुपात जिवंत राहील’, आदिवासी कुटुंबाचा अवयवदानाचा निर्णय

    Nashik Boy Organ Donation : आपला मुलगा आता कधीच डोळे उघडणार नाही, हे सत्य पचवणं कोणत्याही आई-वडिलांसाठी डोंगर कोसळण्यासारखं असतं, परंतु अशाही परिस्थितीत डॉक्टरांनी अवयवदानाचं महत्त्व पटवून दिलं

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : मृत्यू अटळ असला, तरी त्यातूनही अनेकांना नवजीवन देण्याची ताकद ‘ अवयवदान ात’ आहे, याचा हृदयस्पर्शी प्रत्यय नाशिक जिल्ह्याने अनुभवला. बागलाण तालुक्यातील गोलवाड येथील अवघ्या १४ वर्षीय विकास यशवंत महालेच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाने अवयवदान करीत आदर्श निर्माण केला.

    तपासणीनंतर ‘ ब्रेन डेड ’ घोषित

    बागलाण तालुक्यातील गोलवाड येथील विकास महाले हा युवक दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर आधी सटाणा येथे नंतर नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी तीन दिवस अहोरात्र प्रयत्न करूनही त्याच्या मेंदूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याला जीवदान देणे शक्य झाले नाही. अखेर वैद्यकीय तपासणीनंतर त्याला ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यात आले.
    Maharashtra TimesAtal Setu : माझ्या पतीच्या मृत्यूचा दाखला द्या… डोंबिवलीकर तरुणाने अटल सेतूवरुन आयुष्य संपवलं, पत्नीची पावणे दोन वर्षांपासून फरपट

    कुटुंबीयांचा धाडसी निर्णय

    अशा कठीणप्रसंगी मविप्र रुग्णालयातील अवयवदान समुपदेशक डॉ. संजय रकिबे यांनी विकासच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करीत अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. मुलाच्या जाण्याच्या असह्य वेदनांमध्येही कुटुंबीयांनी अत्यंत धाडसी निर्णय घेत अवयवदानाला संमती दिली. या निर्णयानंतर प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या माध्यमातून त्याच्या अवयव वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

    Kolhapur | अनोखा विक्रम, भातापासून बनवले अप्रतिम पदार्थ, कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीत ऐतिहासिक भर

    नाशिक-पुण्यात अवयवदान

    शुक्रवारी रात्री ११ वाजेपासून ते शनिवारी सकाळपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. विकासचे दोन मूत्रपिंड आणि यकृत ग्रीन कॉरिडॉर तयार करून पुणे येथील विविध रुग्णालयांत पाठविण्यात आले. तसेच त्याचे दोन्ही डोळे नाशिकमधील नेत्रपेढीत, तर त्वचा त्वचापेढीत दान करण्यात आली.या संपूर्ण प्रक्रियेत विविध वैद्यकीय पथके, प्रशासन आणि पोलिस यंत्रणा अहोरात्र झटत होती. ग्रीन कॉरिडॉरमुळे अवयव वेळेत पोहोचविणे शक्य झाले. मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकासचे शव कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले.
    Maharashtra TimesLonere Murder : घटस्फोटानंतर 38 वर्षीय प्रियकराचे 22 वर्षीय तरुणीशी सूत जुळलं, चारित्र्याच्या संशयातून लॉजवर जीव घेतला, लोणेरेतील घटनेचा उलगडा

    माझा मुलगा दुसऱ्याच्या रूपात जिवंत राहील

    आपला मुलगा आता कधीच डोळे उघडणार नाही, हे सत्य पचवणे कोणत्याही आई-वडिलांसाठी डोंगर कोसळण्यासारखे असते. मात्र, अशाही परिस्थितीत डॉ. सुधीर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवयव दान समुपदेशक डॉ. संजय रकिबे यांनी अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. विज्ञानाची मोठी पदवी नसली तरी, ‘माझा मुलगा दुसऱ्याच्या रूपात जिवंत राहील‘ हा विचार करीत या आदिवासी कुटुंबाने अवयवदानाला संमती दिली. त्यांचा हा निर्णय समाजातील इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा