• Mon. Jun 15th, 2026
    Prakash Abitkar: महाराष्ट्राने गमावले दोन मुख्यमंत्री! पतंगराव कदम, अजितदादांबाबत आबिटकरांचं वक्तव्य

    Prakash Ambitkar On Ajit Pawar and Patangrao Kadam: भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या ३१व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आबिटकर बोलत होते.

    प्रकाश अबिटकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेले दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांच्यासारखे सक्षम नेतृत्व महाराष्ट्राने गमावल्याची खंत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रविवारी व्यक्त केली. या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकाळात राज्याच्या समाजकारणाला दिशा देऊन राज्याच्या राजकारणात ठसा उमटवला. मात्र, नियतीने त्यांना अकाली हिरावून नेल्याने महाराष्ट्र दोन संभाव्य मुख्यमंत्र्यांना मुकल्याची भावना आबिटकर यांनी व्यक्त केली.

    अक्षय ऊर्जा व दुग्धविकास मंत्री अतुल सावे, भारती विद्यापीठचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, कुलसचिव जी. जयकुमार, आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे, डॉ. के. डी. जाधव या वेळी उपस्थित होते.

    Maharashtra TimesEl Nino Alert: भारतावर मोठं संकट! ‘एल निनो’मुळे हवामानात होणार उलथापालथ, काय सांगतो WMOचा अहवाल
    भारती हॉस्पिटल येथील नूतनीकरण केलेल्या एकत्रित महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्यालय, नेत्ररोग विभाग व नेत्रपेढी; तसेच आय. व्ही. एफ. सेंटरचे उद्घाटन आणि विद्यापीठाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. संशोधन क्षेत्रात यश मिळवणाऱ्या प्राध्यापकांना गौरविण्यात आले.

    ‘राज्यातील रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा, यासाठी योजनेचा विस्तार करण्यात येत आहे. रुग्णालयांना उपचारानंतर मिळणारा निधी वाढविला आहे. आगामी काळात मेंदूविकार, अस्थिरोग, कर्करोग या आजारांच्या रुग्णांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी योजनेत सुधारणा करणार असल्याचेही आबिटकर यांनी नमूद केले.

    Maharashtra TimesAmit Thackeray : ‘त्यांच्यात मुंबई बंद करण्याची ताकद नाही, मराठी रिक्षा चालक मुंबई सुरळीत ठेवतील’; अमित ठाकरेंचं वक्तव्य; म्हणाले, ‘गावी जा…’
    डॉ. विश्वजित कदम म्हणाले, ‘भारती विद्यापीठाचे लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे शैक्षणिक संकुल उभे राहणार आहे. पुण्यात क्रीडासंकुल उभारण्यात येणार आहे.’ डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, ‘शिक्षणात तंत्रज्ञान हे सहायक साधन आहे, पर्याय नाही. शिक्षणात मानवी मूल्य, नैतिकता आणि संवेदनशीलता टिकवून ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे.’ डॉ. राजेंद्र उत्तुरकर, प्रा. डॉ. ज्योती मंडलिक यांनी सूत्रसंचालन केले.

    Maharashtra TimesDevendra Fadnavis: फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे महादेव बालगुडे अटकेत, नेमका आरोप काय?
    पुणे, मुंबईप्रमाणेच आता छत्रपती संभाजीनगरचा विकास होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योग व्यवसायात लवकरच एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक कंपन्या संभाजीनगरमध्ये येत आहेत. औद्योगिक विकासामुळे मनुष्यबळाची आवश्यकता मोठी आहे. वैद्यकीय व्यवस्थेचीही गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे. -अतुल सावे, अक्षय ऊर्जा व दुग्धविकास मंत्री

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा