मराठी सक्तीवरुन मुंबईत वातावरण तापण्याची शक्यता आहे. मराठी सक्तीच्या निर्णयाविरोधात मुंबईतील गोरेगावात सोमवारी चालक संघटनांची बैठक होणार आहे. तर मंत्री प्रताप सरनाईक यांनीदेखील मंत्रालयात महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या दोन्ही बैठकींकडे राज्याचं लक्ष लागणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेत प्रवाशांसोबत संभाषण करणे अनिवार्य असणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 मे पासून करण्यात येणार आहे. पण या निर्णयावर अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांची नाराजी आहे. त्यांचा या निर्णयाला विरोध आहे. मराठी सक्तीच्या या निर्णयाविरोधात अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालक हे संपावर जाण्याच्या तयारीत आहे. हे रिक्षा आणि टॅक्सी चालक येत्या 4 मे पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे वृत्त समोर आलं होतं. पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषेबाबतचा निर्णय मागे घेणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. तसेच मराठी बोलता आली नाही तर थेट परवाना रद्द करणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच थेट संपावर न जाता चर्चेसाठी पुढे या, असं आवाहन करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांना चर्चेसाठी आमंत्रण दिलं आहे. अमराठी चालकांना मराठी शिकवण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. मराठीच्या याच निर्णयावरुन उद्या दोन मोठ्या घटना घडणार आहेत.
चालक संघटनांची गोरेगावमध्ये बैठक
मराठी भाषा वाचता-लिहिता न येणाऱ्या ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे परवाने 1 मेपासून रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई ऑटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियन आक्रमक झाली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ युनियनने सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सोमवारी (27 एप्रिल) गोरेगाव येथे बैठक बोलावली आहे. गोरेगावस्थित केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉलमध्ये होणाऱ्या या बैठकीत विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. यै बैठकीत सरकारच्या निर्णयाविरोधातील पुढील भूमिका निश्चित केली जाणार आहे. या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा जाहीर होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. युनियनचे नेते शशांक राव यांनी चालकांना बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सरकारने निर्णय मागे घेतला नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.युनियनने सरकारच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत हा निर्णय अन्यायकारक आणि गैरकायद्याचा असल्याचा आरोप केला आहे. “फक्त मराठी येत नाही म्हणून परवाने रद्द करणे हा अतिरेकी निर्णय आहे. यामुळे हजारो चालकांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होणार,” असे युनियनकडून स्पष्ट करण्यात आले. या निर्णयामुळे शहरातील मोठ्या संख्येने चालकांचे परवाने धोक्यात येण्याची शक्यता असल्याने परिवहन क्षेत्रात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात बोलावली महत्त्वाची बैठक
‘व्यवहारिक मराठी’ सर्व व्यावसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या चालकांना अनिवार्य करण्यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार नेते शशांक राव आणि शिवसेना नेते संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. ही बैठक उद्या २७ एप्रिल रोजी परिवहन मंत्री यांच्या दालनात (४०१ विस्तारित इमारत, मंत्रालय) दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने अमराठी चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे, या मुद्यासह मराठी भाषा त्यांना शिकवण्यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे, यावर चर्चा होणार आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा