सध्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांची तयारी सुरू झालेली दिसतेय.यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून नीलम गोऱ्हे यांचं नाव चर्चेत आहे.गोऱ्हेंच्या नावावर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी शिंदेंना पत्र लिहिलंय.गोऱ्हेंऐवजी अभिजीत बिचुकलेंना उमेदवारी द्यावी, अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली.गोऱ्हेंनी जनतेतून निवडणूक लढवली तर त्यांना मतं मिळणार नाहीत, असे त्या म्हणाल्या.२४ वर्षात तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं, असा सवालही देसाईंनी उपस्थित केला.