Nagpur Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नागपूरमध्ये एक मोठी घटना उघडकीस आली आहे. शहरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
नागपूर तरुणाची जुन्या वादातून हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर शहरातील कलमना पोलीस ठाणे हद्दीत जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. तर त्याचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत. मृत तरुणाची ओळख रोशन धर्मसिंग उईके अशी झाली आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोशन आणि जावेद उर्फ लाला यांच्यात गेल्या एका वर्षापासून वाद सुरू होता. दोन दिवसांपूर्वीही दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार वाद झाला होता. यावेळी रोशनने जावेदला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर दोघांमध्ये तणाव वाढत गेला. घटनेच्या दिवशी दुपारी सुमारे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास जावेद आपल्या कूलर बनविण्याच्या कारखान्यात काम करत होता. त्याला एका फोन आला आणि त्यानंतर ‘अर्ध्या तासात परत येतो’, असं सांगून तो बाहेर पडला. त्यानंतर तो आपल्या काही साथीदारांसह कळमना परिसरातील वंजारा वस्तीजवळील काच कंपनी परिसरात पोहोचला, जिथे रोशन बसलेला होता. त्यानंतर तिथे पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद झाला. वाद चिघळल्यानंतर जावेदने आपल्या जवळील धारदार शस्त्राने रोशनवर सपासप वार केले. या हल्ल्यात रोशन गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. Pune Accident: पुण्यात भीषण अपघात; डंपरच्या धडकेने कारचा चक्काचूर, नायब तहसीलदारांचा जागीच मृत्यू
याधीही आरोपीवर गुन्हा दाखल
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. माहिती मिळताच कळमना पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला सुरुवात केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी जावेदला ताब्यात घेतलं आहे. Pune Crime : लग्नाच्या वरातीतील भांडण, जुन्या वादातून काटा काढला; पुण्यात भावाने साथीदारांसोबत चुलत भावालाच संपवलं प्राथमिक तपासानुसार 2021 साली जावेदने यशोधर नगर पोलीस ठाणे हद्दीतही एक गुन्हा केला होता. मात्र, त्यावेळी तो अल्पवयीन असल्याने त्याच्यावर कारवाई झाली नव्हती. तसेच मृत रोशनवरही परिसरात किरकोळ चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचे आरोप होते. सध्या पोलिसांकडून फरार असलेल्या तीन आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा