• Sat. Jun 6th, 2026
    Pune Weather: उन्हामुळे जीवाची लाहीलाही! रात्रीच्या उकाड्याने पुणेकर हैराण, पुढील 2 दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’

    Pune Weather Update 26 april 2026: गेल्या आठवड्यात शहरात गारांचा पाऊस पडला होता. मात्र, हवामानातील प्रतिकूल घडामोडींमुळे चार दिवसांपासून पारा ३९ ते ४१ अंशामध्येच रेंगाळला आहे.

    पुणे हवामान अंदाज(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरात शनिवारी पुन्हा एकदा तापमानात वाढ होऊन ते ४०.९ अंशावर पोहोचले. लोहगाव परिसरात ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रात्रीच्या तापमानातही सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली.

    पुणे शहराबरोबरच जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. पुण्यात गुरुवारी कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे नोंदविण्यात आले होते. शुक्रवारी त्यात थोडी घट झाली, दुपारनंतर आकाश ढगाळ होते. उन्हाचा चटका नाही; पण उकाडा वाढला होता. रात्री सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात साडेतीन अंशांनी वाढ होऊन २४.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. शनिवारी सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवला.

    Maharashtra TimesPune News : ऐकावं ते नवलंच! पुण्यात तरुणाने पळवली PMPMLची बस, पोलीस तपासात काय खुलासा? नेमकी चूक कोणाची?
    अकोल्यात उच्चांकी तापमान
    राज्यात शनिवारी उच्चांकी ४५.६ अंश सेल्सिअस तापमान अकोल्यात आणि किमान तापमान २१.६ अंश सेल्सिअस महाबळेश्वरमध्ये नोंदविण्यात आले. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा ४० ते ४५ अंशांच्या पुढेच नोंदवला गेला.

    पुण्यात ‘यलो अलर्ट’
    पुण्यात पुढील दोन दिवसांत कमाल आणि किमान तापमानात वाढ कायम राहणार आहे. दुपारनंतर आकाश सामान्यतः ढगाळ राहणार असून, मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुण्यासाठी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

    Sanjay Gaikwad ला घराबाहेर पडू देणार नाही, वंचित आक्रमक, जोरदार घोषणाबाजी

    पुण्यातील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
    परिसर -कमाल -किमान

    लोहगाव ४२.४ —२७.१
    शिवाजीनगर ४०.९ —२४.३
    वडगावशेरी ४०.७ —२८
    चिंचवड ४०.५ —२६.७
    तळेगाव ४०.१ —१६.७
    हडपसर ३९.६ —२६.६
    पाषाण ३९.२ —२३.३
    एनडीए ३८.७ —२३.२
    आंबेगाव ३८.५ —२५.४
    Maharashtra TimesRaigad News : रायगडमध्ये तब्बल 6 पोलीस कर्मचारी निलंबित, डॅशिंग SP आँचल दलाल यांचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
    उष्माघाताचे रुग्ण वाढले
    राज्यात उष्मा वाढत असताना उष्माघाताच्या रुग्णांची संख्याही वाढती आहे. आत्तापर्यंत ३९ जणांना उष्माघाताचा त्रास झाला. एका व्यक्तीचा त्यामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मात्र वैद्यकीय विश्लेषण झाल्यानंतर निश्चित निदान होईल, असे आरोग्य विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यात नंदुरबार, रत्नागिरी, गडचिरोली, जालना, पालघर, रायगड, सातारा या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन, तर गोंदिया, जळगाव, नाशिक, परभणी, पुणे, सोलापूर, ठाण्यामध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. सोलापूरमध्ये एका रुग्णाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उष्मा वाढत असून येत्या काळात तापमान आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हलका आहार, भरपूर पाणी पिणे, गरज असल्यास वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, उष्माघाताचा त्रास झाल्यास वैद्यकीय मदत घ्यावी, असाही सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा