• Sat. Jun 6th, 2026

    Raigad News : रायगडमध्ये तब्बल 6 पोलीस कर्मचारी निलंबित, डॅशिंग SP आँचल दलाल यांचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

    Raigad News : रायगडमध्ये तब्बल 6 पोलीस कर्मचारी निलंबित, डॅशिंग SP आँचल दलाल यांचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

    रायगडमध्ये 6 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत (LCB) मोठी खळबळ उडवणारी कारवाई समोर आली आहे. एकाच वेळी सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. बोलेरो पिकअपमधील संशयास्पद धातू वाहतूक प्रकरणाच्या तपासात गंभीर गैरवर्तन आणि त्रुटी आढळल्याच्या संशयातून ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पोलीस दलात शिस्तभंग करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

    घटनेनुसार, १ एप्रिल २०२६ रोजी रोहा तालुक्यातील वरसगाव-कमानी परिसरात संशयास्पदरीत्या उभी असलेली महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी आढळली होती. या वाहनामध्ये अंदाजे 1 लाख रुपये किमतीचे तांबे आणि स्टील धातूचे सुमारे २०० किलो तुकडे सापडले होते. या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात अदखलपात्र अहवाल नोंदविण्यात आला आणि पुढील तपास LCB कडे सोपविण्यात आला.

    मात्र, तपास प्रक्रियेदरम्यान संबंधित पोलिसांनी अवलंबलेली कार्यपद्धती संशयास्पद आणि नियमबाह्य असल्याचे निदर्शनास आले. पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, हवालदार संदीप पहेलकर तसेच कर्मचारी बाबासो पिंगळे, मोरेश्वर ओमले, ओंकार सोंडकर आणि लालासो वाघमोडे यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यांच्या वर्तनामुळे शिस्तप्रिय पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

    या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी तातडीने कारवाई करत सहाही जणांना सेवेतून निलंबित केले आहे. त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची विभागीय चौकशी प्रस्तावित असून, ते सेवेत राहिल्यास चौकशीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

    निलंबित कर्मचाऱ्यांना निलंबन कालावधीत रायगड-अलिबाग नियंत्रण कक्ष येथे दररोज दोन वेळा हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, त्यांना शासकीय किट आणि ओळखपत्र तात्काळ जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कालावधीत कोणत्याही प्रकारची खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

    या कारवाईमुळे LCBच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. तपासातील त्रुटी, निष्काळजीपणा की गंभीर गैरवर्तन याबाबत आता विभागीय चौकशीतून सत्य समोर येणार आहे. या घटनेमुळे पोलीस दलातील शिस्त आणि पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

    दरम्यान, संबंधित पोलिसांनी नेमकं काय केलं असेल? त्यांना निलंबित का करण्यात आलं असेल? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या चौकशीत संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. ते दोषी आढळले नाहीत तर त्यांना पुन्हा नियमित सेवेत रुजू केले जाईल. पण या कारवाईची सध्या रायगडमध्ये चांगलीच चर्चा होत आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा