देवी-देवतांच्या नावाखाली सरकार ‘शक्तिपीठ महामार्ग’ लादतंय, असं म्हणत विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय. खऱ्या देवाला आपल्या भक्ताची जमीन गेलेली कधीच चालणार नाही, पण महाराष्ट्रातील एका’ देवाला पाहिजे, असा खोचक टोला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. ईश्वरपूर येथे आयोजित शक्तीपीठ विरोधी जनआक्रोश मेळाव्यातून जयंत पाटलांनी सरकारला इशारा दिला.